आपल्या वाढदिवसाला 'तलाईवा'ची राजकारणात एंट्री ?

2 डिसेंबरला रजनीकांत यांचा वाढदिवस आहे त्याचच औचित्यसाधून ते राजकारणात येण्याची घोषणा करणार असल्याचं बोललं जातंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 10, 2017 08:08 PM IST

आपल्या वाढदिवसाला 'तलाईवा'ची राजकारणात एंट्री ?

10 नोव्हेंबर : अभिनेता कमल हसन नंतर आता सुपरस्टार रजनीकांतही राजकारणात येणार असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, 12 डिसेंबरला रजनीकांत यांचा वाढदिवस आहे त्याचच औचित्यसाधून ते राजकारणात येण्याची घोषणा करणार असल्याचं बोललं जातंय.

मिळालेल्या माहितीनुसार, रजनीकांत स्वतंत्र पक्ष स्थापन करणार आहेत. इतर कोणत्याही पक्षात ते सहभागी होणार नाही. मध्यंतरी भाजपने  रजनीकांत यांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला. पण रजनीकांत  यांना सदस्य किंवा सहकारी म्हणून घेण्याचं ठरवलं तरी ते त्यांची ताकद आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राखून ठेवणार आहेत. भाजपची अशी इच्छा आहे की आगामी विधानसभा निवडणुका स्टालिन विरुद्ध रजनीकांत अश्या व्हाव्या.

दरम्यान, लेखक स्टालिन राजनगम यांच म्हणणं आहे की, रजनीकांत स्वतंत्र्य मताचे असल्या कारणाने ते जातीचं राजकारण करणार नाहीत.

खरं तर रजनीकांत हे राजकारणात येणार असल्याचं समजताच सगळ्यांनीच यावर विश्लेषण देण्यास सुरुवात झाली आहे.

त्यामुळे आता रजनीकांतची राजकारणातली एंट्री कशी राहिल? त्यांना कशा कशाला तोंड द्याव लागणार? आणि मुख्य म्हणजे ते खरंच या गरीब जणतेसाठी झटणार का? हेच बघणं महत्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2017 08:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...