रजनीकांत येणार राजकारणात

आता हा शिवाजी गायकवाड द्रविडी मुलखाच्या राजकारणात दाखल झाला तर काय धुमाकुळ घालेल? जयललिता गेल्यानं निर्माण झालेली पोकळी भरून काढेल का?

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 19, 2017 05:03 PM IST

रजनीकांत येणार राजकारणात

19 जून : दक्षिण भारतीय सिनेमांचा 'थलाईवा' रजनीकांतनं अनेक चित्रपट  गाजवलेत. रील लाईफमध्ये लोकांचा नेता झाल्यावर  आता रीयल लाईफमध्येही नेता होण्याकडेनपाऊल टाकताना रजनीकांत दिसतोय. काही दिवसांपूर्वीच  त्यानं त्याच्या फॅन्सला  'युद्धासाठी तयार राहा' असं आवाहन केलंय.

गेले काही दिवस ते वेगवेगळ्या उजव्या विचारांच्या  पक्षांच्या नेत्यांना  भेटतायत. नुकतंच त्यानं हिंदु मुणिनी या पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली.तमिळनाडूच्या राजकारणावर चर्चाही केली . शेतकरी पक्षाच्या नेत्यांना ही तो भेटला.तसंच  दक्षिण भारतातल्या नद्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी  देशातल्या सगळ्या नद्या जोडाव्या म्हणून त्यानं 1 कोटी रूपये पुढे केले. पण शेतकऱ्यांनी त्यापेक्षा हा प्रश्न मोदींपर्यंत पोचवा अशी मागणी केली. त्यांनी ते पोचवयाचंही कबुल केलं.

अनेक पक्षांनी रजनीकांतना आपल्या पक्षात यावं असं अप्रत्यक्षपणे सुचवलंय. तर  समाजवादी आणि डाव्या विचारांच्या पक्षांनी  त्याच्या राजकारणात यायला  विरोध केलाय. द्रमुकचे अध्यक्ष स्टॅलीन यांनी 'राजकारणात यावं की नाही ,ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे' असं म्हणत सावधगिरी बाळगलीय तर अण्णा द्रमुकनं मात्र  मौन पाळलंय.

आता हा शिवाजी गायकवाड द्रविडी मुलखाच्या राजकारणात  दाखल झाला तर काय धुमाकुळ घालेल? जयललिता गेल्यानं निर्माण झालेली पोकळी भरून काढेल का? याचं उत्तर येणारा काळच देईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2017 05:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...