‘मला प्रचंड वेदना होतायेत’; विवेक यांच्या निधनामुळं Rajinikanth यांना बसला धक्का

‘मला प्रचंड वेदना होतायेत’; विवेक यांच्या निधनामुळं Rajinikanth यांना बसला धक्का

‘हे माझ्या आयुष्यातील कधीही भरुन न निघणारं नुकसान’; विवेक यांच्या निधनामुळं रजनिकांत झाले भावुक

  • Share this:

मुंबई 17 एप्रिल: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विवेक यांचं निधन झालं आहे. ते 59 वर्षांचे होते. शनिवारी पहाटे त्यांना कार्डिअ‍ॅक अरेस्टचा अटॅक आला. त्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. विवेक यांच्या निधनामुळं सुपरस्टार रजनीकांत यांना जबरदस्त धक्का बसला आहे. ‘हे माझ्या आयुष्यातील कधीही भरुन न निघणारं नुकसान आहे’ असं म्हणत त्यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.

रजनीकांत आणि विवेक यांनी शिवाजी द बॉस या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात त्यांनी रजनीकांत यांच्या मामाची भूमिका साकारली होती. अन् याच चित्रपटादरम्यान दोघांची खूप चांगली मैत्री झाली. “आज मी माझा खूप चांगला मित्र गमावला. हे माझ्या आयुष्यातील कधीही भरुन न निघणारं नुकसान आहे. शिवाजी चित्रपटादरम्यान आमची कधीही न तुटणारी मैत्री झाली होती. तो केवळ चांगला अभिनेताच नव्हता तर एक आदर्श मित्रही होता. त्याच्या अचानक जाण्यामुळं मला प्रचंड वेदना होत आहेत.” अशा आशयाचं ट्विट करुन रजनीकांत यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं. त्यांची ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा - एका सलमानमुळं बदललं दुसऱ्या सलमानचं आयुष्य; संघर्ष ऐकून भाईजानही भावुक

विवेक यांचा जन्म तमिळनाडूतील एका गरीब कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळं शाळेतील स्पर्धांमध्ये भाग घेत त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी ऑडिशन्स देण्यास सुरुवात केली. शिवाय उदरनिर्वाह करण्यासाठी ते बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करु लागले. याच दरम्यान 1987 साली मन्नाथी उर्थी वेंडम या चित्रपटात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. खरं तर हा चित्रपट फ्लॉप झाला. परंतु विवेक यांच्या अभिनयाचं कौतुक सर्वांनीच केलं. त्यानंतर त्यांनी अबु सांगिर, केलादी कम्मानी, तंबी पोंटाडी, तमिळ पोन्नू यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. रजनीकांत यांच्या शिवाजी द बॉस या चित्रपटामुळं त्यांना बॉलिवूड चाहते देखील फॉलो करु लागले होते.

Published by: Mandar Gurav
First published: April 17, 2021, 11:49 AM IST

ताज्या बातम्या