खुद्द 'थलायवा'कडून 'बाहुबली'चं भरभरुन कौतुक

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 1, 2017 04:22 PM IST

खुद्द 'थलायवा'कडून 'बाहुबली'चं भरभरुन कौतुक

01 मे : दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या बहुप्रतिक्षित 'बाहुबली 2' चित्रपटाने प्रेक्षकांवर अक्षरक्ष: वेड लावलं आहे. थिएटरबाहेर लागलेल्या लांब रांगांपासून ते सोशल मीडियावर सगळीकडे फक्त बाहुबली आणि प्रभासची चर्चा आहे. या सिनेमामी भुरळ आता खुद्द साऊथ सिने इंडस्ट्रीतील थलायवा म्हणजेच सुपरस्टार रजनीकांत यानाही पडली आहे.

नुकतंच त्यांनी चित्रपटाचं कौतुक करत हा चित्रपट भारतीय सिनेमाचा अभिमान असल्याचं म्हटलं आहेत. रजनीकांत यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

रजनीकांत यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 'बाहुबली 2 भारतीय सिनेमाचा अभिमान आहे. एस एस राजामौली आणि त्यांच्या टीमला माझा सलाम'.

खुद्द रजनीकांत यांनीच कौतुक केलं आहे म्हटल्यावर राजामौली यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी लगेच ट्विटला उत्तर देत, 'थलायवा.....देव स्वत: आम्हाला आशिर्वाद देत आहे असं वाटतं, यापेक्षा मोठं काही असू शकत नाही', असं म्हटलं आहे.

या शिवाय अनेक सिने कलाकारांनी बहुबलीचं भरभरून कौतूक केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2017 03:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...