PM मोदींनंतर Man v/s Wild मध्ये रजनीकांत, भयानक जंगलात बेयर ग्रिल सोबत असताना झाला अपघात

PM मोदींनंतर Man v/s Wild मध्ये रजनीकांत, भयानक जंगलात बेयर ग्रिल सोबत असताना झाला अपघात

मॅन वर्सेस वाइल्डच्या एपिसोडचं शूटिंग करत असताना सुपरस्टार रजनीकांत यांना अपघात झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 29 जानेवारी : सुपरस्टार रजनीकांत नेहमीच त्यांच्या सिनेमांमुळे चर्चेत असतात मात्र यावेळी त्यांच्या सिनेमासाठी नाही तर 'मॅन वर्सेस वाइल्ड' या शोच्या शूटिंगमुळे ते चर्चेत आले आहेत. पीएम नरेंद्र मोदी यांच्यानंतर काही दिवसांपूर्वीच रजनीकांत लवकरच बेयर ग्रिल्सच्या शोमध्ये दिसणार असल्याची माहिती समोर आली होती. डिस्कव्हरी चॅनेलवर टेलिकास्ट होणाऱ्या या शोचं शूटिंग रजनीकांत आणि ग्रिल्स यांनी कर्नाटकच्या बांदीपूर टायगर रिजर्व्हमध्ये सुरू केली आहे. पण या शूटिंग दरम्यान रजनीकांत यांना दुखापत झाली आहे.

एका वेबसाईटनं दिलेल्या वृत्तानुसार मॅन वर्सेस वाइल्डच्या एपिसोडचं शूटिंग करत असताना सुपरस्टार रजनीकांत यांना दुखापत झाली आहे. रजनीकांत आणि बेयर ग्रिल्स सध्या कर्नाटकच्या बांदीपूर अभयारण्यात शूटिंग करत आहेत. या दरम्यान रजनीकांत जखमी झाल्याबद्दल बोलताना एक पोलिस अधिकारी म्हणाले, शूटिंग दरम्यान रजनीकांत यांचं स्वतःवरच नियंत्रण सुटलं आणि त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली. तसेच त्यांच्या हाताला आणि कोपरावरही जखमा झाल्या आहेत.

VIDEO: याड लावलं! तब्बल 15 कोटी वेळा पाहिलं गेलंय प्रियांकाचं सुपरहॉट आयटम सॉन्ग

पोलिस अधिकारी पुढे म्हणाले, रजनीकांत यांना झालेली दुखापत फार गंभीर नाही ते लवकरच ठिक होतील. कर्नाटकमधील शूटिंग संपवून रजनीकांत आणि बेयर ग्रिल्स आता म्हैसूरला रवाना झाले आहेत. त्यांच्या या शूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात रजनीकांत ब्लू कलरच्या जॅकेटमध्ये दिसत आहेत.

सारा अली खान की आणखी कोण? हा VIDEO पाहिल्यावर तुम्हीही व्हाल हैराण

सूत्रांच्या माहितीनुसार या शोच्या शूटिंगसाठी 28 ते 30 जानेवारी या काळात स्पेशल गेस्टसोबत 6-6 तासांच्या शूटिंगची परवानगी देण्यात आली आहे. रजनीकांतनंतर अभिनेता अक्षय कुमार सुद्धा या शोमध्ये दिसणार असल्याचं बोललं जात आहे. या शोचं शूटिंग सुलतान बटेरी हायवे, मेल्लाहल्ली, मुद्दर आणि कल्केरे रेंज या भागात केलं जाणार आहे. हा नॉन टुरिझम झोन असून खास वनसुरक्षा कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली हे शूट केलं जाणार आहे.

भाईजाननं सेल्फी घेणाऱ्या चाहत्याचा फोन हिसकावला, सलमानची दबंगगिरी कॅमेऱ्यात कैद

First published: January 29, 2020, 12:06 PM IST

ताज्या बातम्या