Home /News /entertainment /

रजनीकांतच्या चाहत्याने विजयच्या फॅनला कायमचं संपवलं; Corona वरून सुरू झाला वाद

रजनीकांतच्या चाहत्याने विजयच्या फॅनला कायमचं संपवलं; Corona वरून सुरू झाला वाद

साऊथमध्ये या अभिनेत्यांची अक्षरशः पूजा केली जाते. एका क्षुल्लक वादावरून रजनीकांतच्या चाहत्यानं विजय थलापतिच्या चाहत्याला कायमचं संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

    मुंबई, 24 एप्रिल : एकीकडे साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचे चाहते जगभरात पसरले आहेत. तर दुसरीकडे थलापति विजयचा सुद्धा देशभरात तगडा चाहतावर्ग आहे. या दोघांचे तमिळनाडूमध्ये असे चाहते आहेत की जे त्यांच्यावर खूप प्रेम करतात. त्यामुळे सहाजिकच यांच्यापैकी कोणाचाही चाहता आपल्या आवडत्या अभिनेत्याबद्दल बरं-वाईट बोललेलं एकूण घेणार नाही. त्यामुळे साऊथमध्ये या अभिनेत्यांची अक्षरशः पूजा केली जाते. असं असताना साऊथमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका क्षुल्लक वादावरुन रजनीकांतच्या चाहत्यानं विजय थलापतिच्या चाहत्याला कायमचं संपवल्याची घटना घडली आहे. गुरुवार 23 एप्रिलला विजयचा चाहता एम युवराज आणि त्याचा शेजारी ए दिनेश बाबू यांच्यांत जोरदार वाद झाला. दिनेश बाबू स्वतःला रजनीकांतचा खूप मोठा चाहता मानतो. कोरोना व्हायरस रिलीज फंडवरुन त्यांच्यात सुरू झालेला वाद वाढत गेला आणि नंतर यात विजयचा चाहता युवराज याचा मृत्यू झाला. विकी कौशल झाला आहे स्लीप पॅरालिसिसची शिकार, शेअर केला आजाराचा धक्कादायक अनुभव युवराज आणि दिनेश बाबू एकमेकांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्यानं कोरोना व्हायरस रिलीफ फंडमध्ये दुसऱ्याच्या तुलनेत किती जास्त रक्कम दान केली आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत होते. मात्र क्षुल्लक कारणावरुन सुरू झालेला हा वाद नंतर विकोपाला पोहोचला. पिरस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली आणि दिनेश बाबूनं युवराजवर हल्ला करत त्याला धक्का दिला. धक्का लागून युवराज खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मारकानम पोलीसांनी दिनेशबाबूला या प्रकरणी अटक केली आहे. या हत्येसंदर्भात पुढील तपास सुरू असून युवराजचा मृतदेह परिक्षणासाठी पाँडेचरी येथील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. सोहा अली खानची लेक म्हणतेय गायत्री मंत्र, कोरोना दरम्यान व्हायरल झाला VIDEO काही दिवसांपूर्वीच विजयनं पीअम रिलीफ फंडमध्ये आणि साऊथच्या काही राज्यांच्या मुखंमंत्री रिलीज फंडमध्ये मिळून एकूण 1.3 कोटी रुपयांचं दान दिलं होतं. तर रजनीकांत यांनी कोरोना व्हायरस रिलीज फंडमध्ये 50 लाख रुपये दान केले आहेत. तसेच ते नादिगर संगमच्या सदस्यांना किराना सामान देणार आहेत. कतरिनाच्या बर्थडे पार्टीत असं काय झालं की, सलमान-शाहरुख झाले एकमेकांचे वैरी
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या