राजेश्वरी आणि केके मेनन सांगतायत हळव्या कोपऱ्याविषयी!

राजेश्वरी आणि केके मेनन सांगतायत हळव्या कोपऱ्याविषयी!

बाॅलिवूड कलाकारांना मराठी सिनेमाबद्दल खूप आकर्षण आहे. मराठी सिनेमा एक सांगायचंय...मध्ये के के मेनन आणि राजेश्वरी हळव्या कोपऱ्याबद्दल सांगतायत.

  • Share this:

मुंबई, 04 नोव्हेंबर : बाॅलिवूड कलाकारांना मराठी सिनेमाबद्दल खूप आकर्षण आहे. मराठी सिनेमा एक सांगायचंय...मध्ये के के मेनन आणि राजेश्वरी हळव्या कोपऱ्याबद्दल सांगतायत. आई-वडिलांसोबत मुलांचा हरवत असलेला संवाद सिनेमाचा मुख्य विषय आहे.  के के मेनन आणि राजेश्वरी सचदेव आई-वडिलांच्या भूमिकेत आहेत. काही दिवसांपूर्वी सिनेमाचं टायटल लाँच केलं होतं. त्यावेळी के. के मेनन म्हणाला, ' मी मराठी सिनेमे पाहतो. ते आशयघन आहेत. मला मराठी कळतं. बोलता येत नाही. पण या सिनेमासाठी मी मराठीचे धडे गिरवतोय.'


वडील आणि मुलातलं नातं अव्यक्त असतं. या अव्यक्त नात्याला शब्दांतून मांडत या नात्याची हळवी कहाणी आता गीतरूपानं प्रेक्षकांपुढे आली आहे. जितेंद्र जोशीचे शब्द, शैलेंद्र बर्वेचं संगीत आणि अवधूत गुप्ते, बेला शेंडे, राशी हरमळकरचा आवाज असा योग जुळून आलाय.
देवी सातेरी प्रॉडक्शननं "एक सांगायचंय... Unsaid Harmony" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात केके मेनन, राजेश्वरी सचदेव यांच्यासह पद्मावती राव, मिलिंद फाटक, विनीत शर्मा, शाल्व किंजवडेकर, शुभवी गुप्ते, विभव राजाध्यक्ष, अभिजित अमकर, हर्षिता सोहल, अजित भुरे आदींच्या चित्रपटात भूमिका आहेत. ऑस्कर विजेत्या रेसूल पुकुट्टीनं चित्रपटाच्या ध्वनी आरेखनाची जबाबदारी सांभाळली आहे, तर पुष्पांक गावडेनं सिनेमॅटोग्राफी केली आहे. लोकेश विजय गुप्तेनं या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह त्याचं लेखन, संकलनही केलं आहे. तर चैत्राली गुप्तेनं चित्रपटाच्या वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे. नातेसंबंधांबाबतची एक अत्यंत संवेदनशील कथा या सिनेमात पहायला मिळणार आहे.


'हळवा कोपरा तुझा कोणता सांग ना' असे शब्द असलेलं हे गीत वडील मुलाच्या नात्यातली अव्यक्त भावना नेमक्या शब्दांत व्यक्त करतात.सोशल मीडियावर  उत्तम  प्रतिसाद मिळत असून हे   गाणं नक्कीच रसिकांच्या ह्रदयाचा ठाव घेईल, यात शंका नाही.


संगीतकार अशोक पत्की शिकवणार दिवाळीतले खास पदार्थ
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2018 09:53 AM IST

ताज्या बातम्या