बिग बाॅसच्या घरात राजेश श्रृंगारपुरे परत येतोय !

बिग बाॅसच्या घरात राजेश श्रृंगारपुरे परत येतोय !

आता पुन्हा राजेशची घरात एंट्री होणार आहे. त्यामुळे त्याची ही एंट्री किती दिवसाची असेल ह्याची उत्सुकता आहे.

  • Share this:

मुंबई, 16 जून : बिग बाॅस मराठीच्या घरात कधी काय घडले याचा नेम नाही. बिग बाॅसच्या घरात लवकरच वादग्रस्त ठरलेला अभिनेता राजेश श्रृंगारपुरे घरात एंट्री करणार आहे. त्याची ही दुसऱ्यांदा एंट्री असणार आहे.

मराठी बिग बाॅस या मालिकेनं अल्पवधीत लोकप्रियतेचा शिखर गाठला. रोज होणारे भांडण तंटे, टास्क यामुळे मराठी प्रेक्षकांसाठी बिग बाॅस एक वेगळी मेजवानी ठरली. मध्यंतरी बिग बाॅसच्या घरात रेशम टिपणीस आणि राजेश श्रृंगारपुरे यांच्यातील जवळीकमुळे एकच कल्लोळ माजला होता. बिग बाॅसच्या घरात दोघांच्या जवळीकवर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. एवढंच नाहीतर नाशिकमध्ये अश्लिलता पसरवल्यामुळे गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे 20 मे रोजी राजेशला बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडावं लागलं होतं.

राजेश श्रृंगारपुरे म्हणाला, 'माझं आणि रेशमचं नात म्हणजे...!'

आता तीन आठवड्याच्यानंतर हे वादळ शांत झाल्यावर आता पुन्हा एकदा बिग बाॅसने राजेशला घरात प्रवेश करण्यास एंट्री दिलीये. लवकरच राजेश वाईल्ड काॅर्डद्वारे घरात पाहण्यास मिळणार आहे.

विशेष म्हणजे, या पूर्वीही राजेशला त्याच्या वागण्यावरून त्याला घराबाहेर काढून एक बंद खोलीत एकट्याला ठेवलं होतं. त्यानंतर आठवड्याभरानंतर त्याला घरात पुन्हा घेण्यात आलं होतं. पण आठवड्याभरात रेशमसोबत जवळीक अधिक वाढल्यामुळे त्याला बाहेर पडावं लागलं होतं.

आता पुन्हा राजेशची घरात एंट्री होणार आहे. त्यामुळे त्याची ही एंट्री किती दिवसाची असेल ह्याची उत्सुकता आहे. राजेशच्या येण्याने घरातली समीकरण नव्याने बदलणार एवढं नक्की...

दरम्यान, काल शुक्रवारी बिग बाॅसच्या घरात  “ध्वज विजयाचा उंच धरा रे” या कॅप्टनसीचे कार्य सदस्यांवर सोपवण्यात आले. कॅप्टनपदासाठी मेघा, पुष्कर आणि आस्ताद यांच्यात हा टास्क झाला. आस्तादने माघार घेतल्यामुळे पुष्करच्या कॅप्टनपदाचा मार्ग मोकळा झाला.

बिग बाॅसच्या घरात यावेळी घरातून बाहेर होण्यासाठी शर्मिष्ठा राऊत, भूषण कडू आणि स्मिता गोंदकर यांना नाॅमिनेट करण्यात आलंय.

हे आहेत 'मराठी बिग बॉस'च्या घरातील स्पर्धक -

1) रेशम टिपणीस

2) विनीत बोंडे

3) आत्साद काळे

4) स्मिता गोंदकर

5) भूषण कडू

6) उषा नाडकर्णी

7) मेघा धाडे

8) सई लोकूर

9) पुष्कर जोग

10) राजेश श्रृंगारपुरे

11) नंदकिशोर चौगुले

12) शर्मिष्ठा राऊत

First published: June 16, 2018, 4:21 PM IST

ताज्या बातम्या