मुंबई, 29 डिसेंबर : हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे अभिनेते म्हणजे राजेश खन्ना. राजेश खन्ना यांचा आज 80वा वाढदिवस आहे. आज ते आपल्यात नसले तरी त्यांचे चाहते त्यांची आठवण काढण्याची एकही संधी सोडत नाही. राजेश खन्ना यांनी केवळ अभिनयच केला नाही, तर ते त्यांच्या अभिनयाला जीवदान द्यायचे. राजेश खन्ना यांना प्रेमाने काका म्हटले जायचे. आज त्यांच्या 80 व्या वाढदिवशी त्यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या काकांनी 1 म्हणजेच राजेश खन्ना यांनी 1966 मध्ये चेतन आनंदच्या 'आखरी खत' या सिनेमातून फिल्मी दुनियेत प्रवेश केला. राजेश खन्ना यांनी 1969 ते 1971 या काळात सलग 15 यशस्वी चित्रपट दिले, तेव्हा लोक त्यांना सुपरस्टार म्हणू लागले. 1970 ते 1980 पर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनले. राजेश यांचे संपूर्ण आयुष्य अनेक घटनांनी भरलेलं आहे. देव आनंद नंतर राजेश खन्ना हे दुसरे फिल्मस्टार होते ज्यांच्यासाठी मुली खूप वेड्या होत्या. 1970 च्या दशकात त्यांच्या बंगल्यावर मुलींची इतकी पत्रे यायची की त्यांना वाचण्यासाठी वेगळा माणूस ठेवावा लागायचा. यातील अनेक पत्रे रक्ताने लिहिलेली होती.
हेही वाचा - फिटनेस क्वीन आहेत या अभिनेत्री; मात्र मलायका अरोरा सर्वांच्यावर भारी, पाहा फोटो
एकट्या राजेश खन्ना यांनी जवळपास 20 वर्षे बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले. अमिताभच्या अँग्री यंग मॅन इमेजच्या एन्ट्रीनंतर त्यांचे स्टारडम डगमगले. मग अशी वेळ आली जेव्हा राजेश खन्ना एकटे पडले. राजेश खन्ना यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, एक काळ असा होता की त्यांच्या आशीर्वाद बंगल्याबाहेर लोकांची गर्दी असायची. त्याची ड्रॉईंग रूम पुष्पगुच्छांनी भरलेली होती. पण एक वेळ अशीही आली जेव्हा एक फूलही त्याच्या वाट्याला आले नाही.
एका मुलाखतीत राजेश खन्ना यांनी स्वत: सांगितले की, डिंपलपासून वेगळे झाल्यानंतर त्यांनी 14 महिने स्वत:भोवती एक भिंत बांधली होती. त्यांनी लोकांवर विश्वास ठेवणे सोडले होते, नवीन चित्रपट साइन केले नाहीत. आत्मविश्वास कमी झाला होता. ते सतत चिंतेत असायचे आणि आत्महत्या करण्याचा विचार करायचे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News, Entertainment