Home /News /entertainment /

Rajesh Khanna Birth Anniversary: असंख्य चित्रपट ठरले सुपरहिट, पूर्वपत्नीबरोबर केलेला 'हा' एकमेव सिनेमा झाला नाही प्रदर्शित

Rajesh Khanna Birth Anniversary: असंख्य चित्रपट ठरले सुपरहिट, पूर्वपत्नीबरोबर केलेला 'हा' एकमेव सिनेमा झाला नाही प्रदर्शित

दिवंगत अभिनेते, राजकारणी, चित्रपट निर्माते राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांची आज 78 वी जयंती. अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीवर सत्ता गाजवणारे राजेश खन्ना यांना चित्रसृष्टीतला पहिला सुपरस्टार म्हटलं जातं.

    मुंबई, 29 डिसेंबर: दिवंगत अभिनेते, राजकारणी, चित्रपट निर्माते राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांची आज 78 वी जयंती.  अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीवर सत्ता गाजवणारे राजेश खन्ना यांना चित्रसृष्टीतला पहिला सुपरस्टार म्हटलं जातं. 1966 मध्ये 'आखरी खत' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या राजेश यांनी संपूर्ण करिअरमध्ये 168 फीचर फिल्म आणि 12 शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं. तीनदा त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आलं. 1969 ते 1971 या काळात त्यांनी सलग 15 हिट चित्रपट दिले आणि त्यात ते सोलो हिरो होते. त्यांच्या या कामगिरीनंतर त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतला पहिला सुपरस्टार हे बिरूद प्राप्त झालं. त्या काळातील नवोदित अभिनेत्री डिंपल कपाडिया हिच्याशी यांच्याशी त्यांनी 1973 मध्ये लग्न केलं आणि 1982 मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. राजेश खन्ना यांनी अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं पण त्यांची पूर्वपत्नी डिंपल हिच्यासोबत त्यांनी फक्त एकाच चित्रपटात काम केलं होतं आणि तो प्रदर्शितच झाला नाही. (हे वाचा-हा प्रसिद्ध अभिनेता कोरोना पॉझिटिव्ह, शुक्रवारी केली होती ख्रिसमस पार्टी) ‘जय शिव शंकर’ नावाच्या चित्रपटात राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची जोडी होती. 1987 मध्ये या चित्रपटाचं शूटिंग सुरू  झालं होतं. राजेश खन्नाच या चित्रपटाचे निर्माते होते. राजेश खन्ना आणि मुमताज यांच्या गाजलेल्या चित्रपटातील ‘जय जय शिव शंकर काँटा लागे ना कंकर’ या गाण्याच्या बोलांवरूनच  त्या चित्रपटाचं नाव ठेवण्यात आलं होतं. अमेरिकेतील कॅलिफोर्नियात या चित्रपटाचा काही भाग चित्रित करण्यात आला होता. तिथं राजेश आणि डिंपल यांचं एक रोमँटिक गाणं शूट झालं होतं. या चित्रपटात चंकी पांडे आणि संगीता बिजलानी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. ते दोघंही याच चित्रपटातून हिंदी सृष्टीत पदार्पण करणार होते. पण हा चित्रपट रिलीजच झाला नाही. (हे वाचा-इरफान खानला मोठ्या पडद्यावर पाहण्याची अखेरची संधी) आणखी एक गंमतीची गोष्ट म्हणजे नंतर राजेश खन्ना यांचा जावई झालेल्या अक्षय कुमारनेही उमेदीच्या काळात त्या चित्रपटातील चंकी पांडेच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. पण राजेश खन्नांना ती पसंत पडली नव्हती. या सिनेमात अर्चना पूरण सिंगलाही पहिल्यांदा निवडलं होतं पण नंतर तिलाही चित्रपटातून काढून टाकलं. तिला का काढलं गेलं हे अजूनही कुणालाचं माहीत नाही. प्रमुख भूमिकांसाठी पहिल्यांदा विनोद खन्ना, मिथुन चक्रवर्ती आणि जॅकी श्रॉफ यांची निवड झाली होती पण त्यांच्याऐवजी राजेश खन्ना, जितेंद्र आणि चंकी पांडे यांना त्या भूमिका देण्यात आल्या. रूप तेरा मस्ताना, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, जय जय शिवशंकर यासारखी अजरामर गाणी पडद्यावर राजेश खन्नांनी गायली पण त्यांना आवाज होता किशोरकुमार यांचा. राजेश यांचा आवाज म्हणजे किशोर अशीच ओळख अख्या चित्रपटसृष्टीला होती. या चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्याआधी एक महिना  गायक किशोरकुमार यांचं निधन झालं होतं. त्यानंतर राजेश खन्ना यांनी चित्रपटातली सगळी गाणी किशोरकुमारांचा मुलगा अमितकुमार याच्याकडून गाऊन घेतली. 1990 मध्ये चित्रपट पूर्ण झाला होता पण रिलीज होऊ शकला नाही. (हे वाचा-'त्वाडा कुत्ता टॉमी, साडा कुत्ता कुत्ता'वर Friends मधील दृश्यांंचं रिक्रिएशन) चित्रपट गाजणं, पडणं, रिलीज होणं न होणं हा सगळा नशीबाचा भाग असतो हे सगळेच मान्य करतात पण प्रत्येक चित्रपटाचं वेगळं नशीब असतं. तसंच जय शिव शंकर या चित्रपटातून अनेक गोष्टी घडल्या असत्या पण त्या घडल्या नाहीत. राजेश-डिंपल जोडीला पहिला चित्रपट, चंकी-संगीताचं पदार्पण, कदाचित अमितकुमारचंही पदार्पण या सगळ्याच गोष्टी राहून गेल्या कारण कुणालाच माहीत नाही.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या