समिक्षक राजीव मसंद यांना कोरोनाची लागण; ऑक्सिजन कमी झाल्यानं ICUमध्ये दाखल

समिक्षक राजीव मसंद यांना कोरोनाची लागण; ऑक्सिजन कमी झाल्यानं ICUमध्ये दाखल

राजीव मसंद यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई 3 मे: कोरोना रुग्णांची (COVID-19) संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अनेक नामांकित कलाकार देखील कोरोनाच्या विळख्यात अडकलेले दिसत आहेत. या कलाकारांच्या यादीत आता आणखी एका सेलिब्रिटीची भर पडली आहे. प्रसिद्ध चित्रपट समिक्षक आणि धर्मा कॉर्नरस्टोन कास्टिंग एजन्सीचे सीईओ राजीव मसंद (Rajeev Masand) यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत बिघडली होती. त्यामुळं त्यांनी कोरोना टेस्ट केली. अन् त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र मिळालेल्या रिपोर्टनुसार त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्र हळूहळू कमी होत चालली आहे. त्यामुळं नाजून परिस्थितीत असल्यामुळं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

फिट राहण्यासाठी भूषण प्रधान करतो हा व्यायाम; पाहा मराठी अभिनेत्याचा फिटनेट फंडा

24 तासांत 4 लाखांहून जास्त कोरोना रुग्ण सापडलेला भारत हा जगातला पहिलाच देश ठरला आहे. या आकडेवारीमुळे एक नकोसा विक्रम भारताच्या नावावर आला आहे. त्यामुळे देशातल्या कोरोनाबाधितांची आत्तापर्यंतची एकूण संख्या आता 1 कोटी 91 लाख 64 हजार 969 इतकी झाली आहे. यासोबतच गेल्या 24 तासांमध्ये देशात 3 हजार 523 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. त्यामुळे देशाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार तडाखा बसल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे.

Published by: Mandar Gurav
First published: May 3, 2021, 1:02 PM IST

ताज्या बातम्या