रजनीकांतच्या 'कबाली'नंतर आता 'काला करिकालन'

रजनीकांतच्या 'कबाली'नंतर आता 'काला करिकालन'

मुंबईत राहणारे दाक्षिणात्य यांच्यावर हा सिनेमा आधारित आहे.हिंदी आणि तेलगुमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल.

  • Share this:

25 मे : 'कबाली'नंतर रजनीकांत अर्थात थलायवाच्या चाहत्यांना उत्सुकता होती ती रजनीकांत यांच्या आगामी सिनेमाची.नुकतंच 'काला करिकालन' या सिनेमाचं पोस्टर वेबदुनियेत प्रसिद्ध झालं. पा रजनीथ हे याचं दिग्दर्शन करणार आहेत.

कबालीमध्ये मराठी अभिनेत्री राधिका आपटे रजनीकांतसोबत झळकली यावेळी पुन्हा रजनीकांतसोबत मराठी अभिनेत्री दिसेल जिचं नाव आहे अंजली पाटील. कबालीचे संगीतकार संतोष नारायणन याही सिनेमाला संगीत देणार आहेत. 28 मेपासून सिनेमाचं शूटिंग मुंबईत सुरु होतंय.

मुंबईत राहणारे दाक्षिणात्य  यांच्यावर हा सिनेमा आधारित आहे.हिंदी आणि तेलगुमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल.तूर्तास रिलीज डेट जाहीर झाली नसली तरी 2018मध्ये रजनीकांतचा काला करिकालन हा सिनेमा भेटीला येईल. रजनीकांतचा जावई धनुषनं हे पोस्टर ट्विट केलंय.

First published: May 25, 2017, 12:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading