Home /News /entertainment /

माइंड इट! थलायवाने बेअर ग्रिल्सला शिकवली ‘रजनी स्टाईल’, सुपरस्टार रजनीकांतचा जंगलातील थरारक VIDEO

माइंड इट! थलायवाने बेअर ग्रिल्सला शिकवली ‘रजनी स्टाईल’, सुपरस्टार रजनीकांतचा जंगलातील थरारक VIDEO

wwww

wwww

असं म्हणतात, रजनीकांत करू शकत नाही असं काहीच नाही. हजारो मीम्स सुद्धा त्यावर बनले आहेत. आता सुद्धा 69 वर्षांचा अवलिया कलाकार एका नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

    मुंबई, 09 मार्च : भारतामध्ये रजनीकांतचे इतके फॅन्स आहेत, की अक्षरश: अनेक जण त्यांना देवच मानतात. त्यांचा चित्रपट सिनेमागृहामध्ये लागला की तो पाहण्याकरता तुफान गर्दी होते. इतकी की सिनेमागृह सुद्धा कमी पडतात. त्यांची स्टाइलही फार हटके आहे. अनेक दाक्षिणात्य आणि बॉलिवुड कलाकार त्यांची स्टाइल आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात. असं म्हणतात, रजनीकांत करू शकत नाही असं काहीच नाही. हजारो मीम्स सुद्धा त्यावर बनले आहेत. आता सुद्धा 69 वर्षांचा अवलिया कलाकार एका नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ते पाहुन तुम्हालाही एकदाही वाटणार नाही की या माणसाने साठी ओलांडली आहे. यामध्येही त्यांनी आपली खास ‘रजनी स्टाइल’ सोडली नाही. (हे वाचा-सुहाना खानचं इन्स्टाग्राम अकाउंट झालं व्हेरिफाइड,पदार्पणाआधीच आहेत लाखो फॉलोअर्स) पंतप्रधान नरेंद्र मोदींंनंतर आता रजनीकांत लवकरच मॅन व्हर्सेस वाइल्ड (Man vs Wild) फेम बेअर ग्रिल्सचा अपकमिंक शो ‘इंटू द वाइल्ड विद बेअर ग्रिल्स’ (Into the wild with Bear Grylls) मध्ये दिसणार आहेत. या कार्यक्रमाचा प्रोमो बेअर ग्रिल्सने आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे. हा कार्यक्रम 23 मार्चला संध्याकाळी 8 वाजता पाहायला मिळणार आहे. कर्नाटकमधील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पामध्ये या कार्यक्रमाचं शूटिंग करण्यात आलं आहे. (हे वाचा-'बधाई हो'च्या सिक्वेलमध्ये आयुष्मानच्या जागी 'राजकुमार राव', अभिनेत्रीही बदलली) या प्रोमोमध्ये सुपरस्टार रजनीकांत आणि बेअर ग्रिल्स दोघे पुलावर लटकताना, प्राण्यांचा सामना करताना दिसत आहेत. दोरीचा आधार घेऊन चढण चढण्याचा अनुभव सुद्धा रजनीकांच यांनी घेतला. हा व्हिडीओ शेअर करताना बेअर ग्रिल्सने लिहिलं आहे की, ‘सुपरस्टार रजनीकांत यांची अथक सकारात्मकता आणि कधीही न हरण्याची वृत्ती जंगलामध्ये पाहायला मिळाली. ज्यामुळे त्यांनी त्यांच्यासमोर आलेलं प्रत्येक आवाहन स्वीकारलं.’ या प्रोमोमध्ये वेगवेगळे थरारक अनुभव घेताना थलायवा रजनीकांत दिसत आहे. मात्र या व्हिडीओमध्ये एक खास गोष्ट आहे, ती म्हणजे रजनीकांत त्याची खास रजनी स्टाइल ग्रिल्सला शिकवली आहे. चष्मा फिरवून मग घालायचा, ही स्टाइल रजनीकांतमुळेच सुरू झाली आणि अनेकांनी ती त्यांच्या चित्रपटांमध्ये वापरली. पण शेवटी इतर कुणीही रजनीकांतच्या स्टाइलमध्ये चष्मा घालूच शकत नाही. त्याचप्रमाणे रजनीकांत यांनी यामध्ये अनुभवलेला थरार पाहून हेच वाटेल की, खरंच रजनीकांत काहीही करु शकतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Bear grylls, Discovery man vs wild, Rajanikanth

    पुढील बातम्या