रजनीकांतने हिमालयात बांधलं मेडिटेशन सेंटर

रजनीकांतने हिमालयात बांधलं मेडिटेशन सेंटर

'थलाइवा' रजनीकांत आणि त्यांच्या मित्रांनी एकत्र येऊन हिमालयामध्ये मेडिटेशन सेंटर उभारलं आहे. योगदा सत्संग सोसायटीच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या मेडिटेशन सेंटरची स्थापना केली गेली आहे.

  • Share this:

26 आॅक्टोबर : 'थलाइवा' रजनीकांत आणि त्यांच्या मित्रांनी एकत्र येऊन हिमालयामध्ये मेडिटेशन सेंटर उभारलं आहे. योगदा सत्संग सोसायटीच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या मेडिटेशन सेंटरची स्थापना केली गेली आहे. या संस्थेची स्थापना परमहंस योगानंद यांनी केली होती.

गेली दहा वर्ष रजनीकांत मेडिटेशनसाठी हिमालयाजवळील दुनागिरीमध्ये येतात. या आधी तिथे महावतार बाबाजी राहायचे.

रजनीकांतचे मित्र वकील व्ही. विश्वनाथन म्हणतात की, हे मेडिटेशन सेंटर गुफांजवळ बांधण्यात आलं आहे. या मेडिटेशन सेंटरची किंमत सुमारे एक कोटी रुपये इतकी आहे. इथं येणारे लोक इथल्या आश्रमामध्ये मोफत राहू शकतात.

या प्रकल्पाच्या व्यतिरिक्त रजनीकांत त्याच्या '2.0' या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. या सिनेमात अॅमी जॅक्सन आणि अक्षय कुमार रजनीकांत यांच्यासह मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात अक्षय कुमार हा नकारात्मक भूमिकेत आहे. त्यात त्याचा लूक अगदी हटकेच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2017 07:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...