मुंबई, 26 नोव्हेंबर : आजकाल कलाकारांचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होणं फार वाढलं आहे. बालपणीचे आणि आताचे कलाकार यांच्यात इतका फरक झालाय की त्यांना ओळखणंच कठीण झालं आहे. तर काही कलाकारांमधील बालपणीचं ते निखळ रुप अजूनही टिकून आहे. दरम्यान एक फोटो समोर आला आहे. ज्याच एक हँडसम मुलगा दिसत आहे. कोणतीही मुलगी त्याच्यावर फिदा होईल असाच तो दिसत आहे. पण हा साधा सुधा मुलगा नसून एक प्रसिद्ध अभिनेता आहे. नुसताच अभिनेता नाही टेलिव्हिजनवरचा प्रसिद्ध चेहरा आहे. तुम्ही ओळखलं का या अभिनेत्याला. नाही. हो या अभिनेत्याला ओळखणंच कठीण झालं. कोण आहे हा अभिनेता जाणून घ्या.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या अभिनेत्याचा फोटो अनेक वेळा झुम करून पाहिला पण हा नेमका कोण आहे हे कळत नाहीये. त्याचा ड्रेसिंग सेन्स फारच उत्तम आहे. बॉडी आणि स्टाइल तर कोणत्याही तरूणीला प्रेमात पाडेल अशी आहे. त्याच्या बिअर्ड वरून तर लक्षच हटत नाहीये. पण हा अभिनेता आहे कोण तुम्ही ओळखलंत का? नाही. अजून नाही ओळखलं. तर तुमच्यासाठी आणखी एक हिंट हा मराठमोळा अभिनेता असून त्याची मालिका टेलिव्हिजनवर सुपरहिट झाली होती.
हेही वाचा - Manasi Naik: 'अशा मुलींबरोबर गेम खेळू नका ज्या...'; घटस्फोटाची कबूली दिल्यानंतर मानसी नाईकच्या पोस्ट थांबेना
तुम्ही पाहात असलेल्या फोटोमधील अभिनेता फारच वेगळा दिसतो आहे. त्याच्या लुक्समध्ये कामालीचे बदल झालेत. दररोज टेलिव्हिजनवर दिसणाऱ्या या अभिनेत्यानं एका फोटोमध्ये सगळाच लुक बदलून टाकला आहे.
View this post on Instagram
तर अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून राजा राणी ग जोडी मालिकेतील प्रेक्षकांचा लाडका रणजीत ढाले पाटील आहे. रणजीत म्हणजेच अभिनेता मणिराज पवार.
अभिनेता मणिराज पवार सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. मणिराजनं नुकतंच एक फोटोशूट केलं. त्याचे फोटो त्यानं सोशल मीडियावर शेअर केलेत. मात्र या फोटोंमध्ये मणिरातचा लुक इतका चेंज झाला आहे की त्याला ओळखणंच कठीण झालं आहे.
राजा राणीची ग जोडी मालिकेत संजू आणि रणजीतची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडायची. मालिका संपली असली तरी प्रेक्षक दोघांना खूप मिस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Colors marathi, Marathi entertainment, Marathi news, Marathi Serial