Home /News /entertainment /

आता Raja Rani Chi Jodi खाकी वर्दीत; रणजीत ढालेपाटीलही पुन्हा बनला पोलीस

आता Raja Rani Chi Jodi खाकी वर्दीत; रणजीत ढालेपाटीलही पुन्हा बनला पोलीस

कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी (raja rani chi ga jodi) मालिकेत एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळाणार आहे. रणजीतच्या अंगावर पुन्हा एकदा वर्दी चढणार आहे.

  मुंबई , 21 ऑक्टोबर : कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी (raja rani chi ga jodi)मालिका महाराष्ट्रात तुफान गाजते आहे. संजू आणि रणजीत ढालेपाटील (sanjeevani ranjeet dhale patil )म्हणजेच शिवानी सोनार – मनिराज पवार( shivani sonar and maniraj pawar )यांना प्रेक्षकांचे मालिका सुरू झाल्यापासूनच भरभरून प्रेम मिळते आहे. मालिकेतील संजू तिच्या बेधडक आणि बिनधास्त व्यक्तिमत्वासाठी लोकप्रिय आहे. कुटुंब असो वा नोकरी संजू तिची जबबाबदारी प्रामाणिकपणे आणि चोखपणे निभावते आहे. आता मालिकेत एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळाणार आहे. रणजीतच्या अंगावर पुन्हा एकदा वर्दी चढणार आहे. रणजीतला त्याची वर्दी परत मिळणार आहे असंच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दिसत आहे. कारण या प्रोमोमध्ये नवीन एसीपी साहेबांची एंट्री दाखवण्यात आली आहे. ते एसीपी म्हणजे दुसरं तिसरं कोण नसून रणजीत ढालेपाटील आहे. रणजीतला वर्दीत पाहून संजूच्या तोंडून आपोआप फौजदार येते. तसेच ती तिच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये TOKKKKकरतावा दिसत आहे. आता मालिकेत पुढं काय होणार तसेच रणजीतल त्याची वर्दी कशी परत मिळाली याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
  यासोबतच शिवानी सोनारने देखील तिच्या इन्स्टाला रणजीतसोबतचा एक वर्दीतील फोटो शेअर करत म्हटलं आहे की, काय वाटत आहे रणजीत पुन्हा एसीपी होणार का..?  मात्र नवीन प्रोमो पाहून तर असंच दिसत आहेत लवकरच मालिकेत एसपी साहेबांचा रूबाब पाहायला मिळणार आहे. मालिका सुरू झाली तेव्हा संजूचा TOKKKK संपूर्ण महाराष्ट्रात फेमस झाला. अजूनही तिने तोंडातून काढलेला TOKKKK हा आवाज लोकप्रिय आहे. त्यातच संजू PSI झाल्यानंतर तिच्यात झालेला अमुलाग्र बदल सुद्धा प्रेक्षकांना विशेष भावतोय. वाचा . बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी जान्हवी कपूरने केला होता हा कोर्स; आर्यन खाननेही.... संजू पोलीस झाल्यापासून ती सातत्याने बुलेटवरुन फिरताना दिसते तेही अगदी रणजीतप्रमाणे. एखाद्या प्रशिक्षित बाइकर्सप्रमाणे बुलेट चालणारी संजू अवघ्या दोन दिवसांमध्ये गाडी चालवायल्या शिकल्याचं तिनं सांगितलं आहे.मनिराजने म्हणजेच रणजीतने तिला बुलेट चालवायला शिकवले आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Tv serial

  पुढील बातम्या