03 सप्टेंबर: आपल्या आजोबांच्या पावलांवर पाऊल ठेवत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलीनेही बॉलिवूडमध्ये एंट्री केलीये. 22 वर्षांच्या उर्वशी ठाकरे हीने डेव्हिड धवन यांच्या 'जुडवा-2' या सिनेमात असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, लवकरच रिलीज होणाऱ्या जुडवा 2 या सिनेमामध्ये उर्वशी ठाकरे हिने ड असिस्टंट डायरेक्टर म्हणून पदार्पण केलं आहे. सुरूवातीला डेव्हिड धवन हे उर्वशी दिग्दर्शन कशी करेल याबद्दल साशंक होते. पण नंतर तिचं काम बघून डेव्हिड धवन खूश झाले. तिने पदार्पणातच अत्यंत चांगली कामगिरी केली आहे असं कौतुक धवन यांनी केलंय.
एवढंच नाहीतर जुडवा 2 नंतर तिला साजिद खाननेही कामासाठी आॅफर दिली. उर्वशी साजिद नाडियाडवालाच्या आगामी प्रोजेक्टमध्ये सहभागी होणार आहे.
उर्वशीने मात्र यावर अजून काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या तरी तीला ब्रेक मिळाल्याच्या आनंदात ती आहे आणि अजून खूप काही करणं बाकी आहे असं तिचं म्हणणं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा