मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे शिल्पा शेट्टीला मोठा झटका; Super Dancer Chapter 4 बाबत घेतला निर्णय

राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे शिल्पा शेट्टीला मोठा झटका; Super Dancer Chapter 4 बाबत घेतला निर्णय

राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे शिल्पाच्या करिअरला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे शिल्पाच्या करिअरला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे शिल्पाच्या करिअरला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

मुंबई, 21 जुलै : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांच्याविरोधात पॉर्नोग्राफीची (Raj Kundra Pornography Case) केस समोर आली आहे. राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. परिणामी शिल्पा शेट्टीला याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर शिल्पाला मोठ्या प्रमाणात ट्रोलला सामोरं जावं लागत आहे. राज कुंद्रा प्रकरण शिल्पा शेट्टीच्या करिअरवरही परिणाम करू शकतं, अशी शक्यता आहे.

शिल्पा शेट्टीचा Super Dancer Chapter 4 चांगला गाजत आहे. याचं नाव सर्वाधिक लोकप्रिय मालिकांमधील यादीत घेतलं जातं.  दिग्ददर्शक अनुराग बासू, नृत्यदिग्दर्शक गीता कपूर आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा हे तीघे या डान्स रिअॅलिटी शोचे जज आहेत. मात्र मंगळवारी शिल्पा शेट्टी या शोच्या शूटसाठी आली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्याशिवाय पुढील काही शोमध्येही शिल्पा शेट्टी दिसणार नसल्याचं समोर आलं आहे. शिल्पा शेट्टीच्या जागी आता करिश्मा कपूर या डान्स रिअॅलिटी शोच्या जजची खुर्ची सांभाळणार आहे, अशी माहिती pinkvilla ने प्रसिद्ध केली आहे.

हे ही वाचा-दोषी आढळल्यास शिल्पा शेट्टीच्या पतीला होऊ शकते तब्बल इतक्या वर्षांची शिक्षा

अभिनेत्री शिल्पा शेट्टी तब्बल 14 वर्षांनी बॉलिवूडमध्ये परतत आहे. ती सध्या 2 बिग बजेट चित्रपटांत झळकणार आहे. लवकरच ती बहुप्रतीक्षित निकम्मा आणि हंगामा 2 या चित्रपटांत दिसणार आहे. शिल्पाचा पती राज कुन्द्राच्या अटकेच्या थेट परिणाम तिच्या चित्रपटावर पडू शकतो. त्यामुळे तिच्या अडचणींत वाढ झाल्याचं म्हटलं जातं आहे. 2003 मध्ये आलेल्या हंगामा या विनोदी चित्रपटाचा ‘हंगामा 2’ हा सिक्वल आहे. येत्या 23 जुलैला हा चित्रपटा डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

हे प्रकरण नेमकं आहे तरी काय?

फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

First published:
top videos

    Tags: Raj kundra, Shilpa shetty