मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'तिला बाहेर काढावचं लागेल' त्या अभिनेत्रीच्या अटकेनंतर हडबडली होती राज कुंद्राची टीम; Chats Viral

'तिला बाहेर काढावचं लागेल' त्या अभिनेत्रीच्या अटकेनंतर हडबडली होती राज कुंद्राची टीम; Chats Viral

राजच्या टीममधील जवळच्या व्यक्तींचे व्हाट्सअप चॅट्स आता समोर आले आहेत.

राजच्या टीममधील जवळच्या व्यक्तींचे व्हाट्सअप चॅट्स आता समोर आले आहेत.

राजच्या टीममधील जवळच्या व्यक्तींचे व्हाट्सअप चॅट्स आता समोर आले आहेत.

  • Published by:  News Digital

मुंबई 25 जुलै: राज कुंद्रा (Raj Kundra) अश्लिल चित्रफिती प्रकरणात आता रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अनेकांची नावही आता समोर येत आहेत. दरम्यान शुक्रवारी उशीरा शिल्पा शेट्टीचीही (Shilpa Shetty) चौकशी करण्यात आली. तर काही महत्त्वपूर्ण व्हाट्सअप चॅट्स (Whatsapp chats) समोर आले आहेत. जे राजच्या अगदी जळच्या व्यक्तींचे आहेत.

दरम्यान या सगळ्या प्रकरणाची सुरूवात फेब्रुवारी महिन्यातच झाली होती. त्यावेळी अभिनेत्री आणि मॉडेल गहना वशिष्ठला (Gehana Vahishth) पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान आता गहनाची सुटका झाली असून राजला अटक झाली आहे. तर गहना राजला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे.

7 फेब्रुवारीला गहनाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर राजच्या टीममधील जवळच्या व्यक्तींचे व्हाट्सअप चॅट्स आता समोर आले आहेत. ज्यात राजचे सहकारी यश ठाकूर (Yash Thakur) आणि उमेश कामत (Umesh Kamat) तिच्या अटकेनंतर चिंता व्यक्त करत आहेत. तर पूर्णपणे घाबरलेले दिसत आहेत.

तब्बल 21 वर्षे लहान मान्यता सोबत संजय दत्तचे जुळले सुत; असं झालं संजूबाबाचं तिसरं लग्न

यात ते दोघेही पैशांच्या व्यवहाराविषयी बोलत आहेत तर लवकरात लवकर 8 लाखांची मागणी गहनाला सोडवण्यासाठी केली जात आहे. पुढे यश उमेशला सांगत आहे की, “तिला लवकरत लवकर बाहेर काढाव लागेल नाहीतर कोर्टात गेली तर ती सगळ्यांचं नाव घेईन.”

त्यानंतर उमेश यशला सागंत आहेकी, “मला वाटतय काही दिवस शिमल्याला जाऊ. तिथेच शुट देखील करेन”, यावर यशने रिप्लायमध्ये म्हटलं आहे की, “चांगलं आहे, तुम्ही सुरक्षित राहीलात तर माझंही डोक शांत राहील.”

दरम्यान अश्लिल चित्रफीती प्रकरणात आतापर्यंत मुंबई क्राइम ब्रँचने 11 लोकांना अटक केली आहे. अनेकांची अजूनही चौकशी सुरू आहे. गहनाने राजच्या अटकेनंतर एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात ती राजची पाठराखण करत होती. व पॉर्न आणि एरोटीक चित्रपटांतील फरत तिने सांगितला होता. त्यामुळे आता पुढे हे प्रकरण नक्की काय वळण घेणार हे पाहणं ही महत्त्वाचं ठरेलं.

First published:

Tags: Entertainment, Raj kundra, Shilpa shetty