• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘भावोजीसोबत होते संबंध’; शिल्पा शेट्टीच्या पतीनं पूर्वपत्नीबाबत केले खळबळजनक आरोप

‘भावोजीसोबत होते संबंध’; शिल्पा शेट्टीच्या पतीनं पूर्वपत्नीबाबत केले खळबळजनक आरोप

राज कुंद्रानं केले मोठे आरोप; घटस्फोटित पत्नीच्या आरोपांना दिलं जोरदार प्रत्युत्तर

 • Share this:
  मुंबई 12 जून: शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा (Raj Kundra) हे बॉलिवूडमधील एक परफेक्ट कपल म्हणून चर्चेत असतं. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल शिल्पासोबत संसार थाटण्यापूर्वी त्यानं पत्नी कविताला घटस्फोट दिला होता. या प्रकरणावर राज किंवा शिल्पानं कधीही भाष्य केलं नव्हतं. परंतु कवितानं केलेल्या त्या खळबळजनक आरोपांमुळं ते प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. (Raj Kundra opens up on his divorce with Kavita) अन् या आरोपांवर प्रत्युत्तर देताना राजनं आपल्या घटस्फोटाचं कारणही सांगितलं आहे. कवितानं आलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत राजसोबतच्या घटस्फोटाला शिल्पा शेट्टी जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. “तिनं माझ्या संसारात आग लावली. राज एक विवाहित पुरुष आहे हे माहित असताना देखील तिनं त्याच्यासोबत जवळीक वाढवली. तिच्यामुळंच आमचा हसता-खेळता संसार मोडला” असा आरोप तिनं केला. तिच्या या आरोपांवर आता राज कुंद्रा यानं प्रत्युत्तर दिलं आहे. आतापर्यंत तो शांत होता कारण शिल्पानं त्याला यावर बोलण्यास मनाई केली होती असं तो म्हणाला. मिका सिंगच्या नव्या गाण्याचा धुमाकूळ; ‘केआरके कुत्ता’ म्हणत उडवली खिल्ली पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत राजनं कविताची पोलखोल केली. तो म्हणाला, “कविता एक विक्षिप्त प्रवृत्तीची स्त्री आहे. माझं कुटुंब माझ्यासाठी सर्वकाही आहे. परंतु ती माझ्या कुटुंबाला त्रास देत होती. माझे आई-वडिल, बहिण आणि तिचा पती आम्ही युरोपमध्ये असताना एकाच घरात राहात होते. त्यावेळी ती माझ्या बहिणीच्या पतीच्या खुपच क्लोज आली होती. ती त्याच्यासोबतच अधिक वेळ घालवायची. मला सतत टाळायची. अन् या प्रकरणावर मी जेव्हा कधी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिनं उडवाउडवीची उत्तरं दिली. माझ्या ड्रायव्हरनं देखील दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं आहे.” अभिनेत्रीची विचित्र फॅशन; पाहा बिग बॉस फेम बिनाफ्शा सुनावालाचे Hot फोटो पुढे तो म्हणाला, “या प्रकरणामुळं माझ्या बहिणीनं युकेतील घर सोडलं व ती भारतात परतली. भारतात आल्यानंतरही दोघांमध्ये काहीतरी सुरुच होतं. याच दरम्यान बहिणीला तिच्या पतीचा दुसरा फोन मिळाला. अन् त्यामधील मेसेज पाहून सर्व खुलासा झाला. माझ्या पत्नीचे आणि बहिणीच्या पतीचे संबंध होते. या बाबत माझ्याकडे पुरावे देखील होते परंतु दोघांनी कायमच नकार दिला. या प्रकरणाला वैतागून अखेर मी कविताला घटस्फोट दिला. या प्रकरणाशी शिल्पाचा काहीही संबंध नाही. ती उगाचच प्रसिद्धीसाठी तिला यामध्ये खेचत आहे. इतके दिवस मी शांत होतो कारण याबाबत मी काहीही बोलू नये अशी शिल्पाची इच्छा होती. माझं कुटुंबच माझी पहिली प्रायोरिटी आहे त्यामुळं मी शांत राहणं पसंत केलं होतं. पम आता ती माझ्या कुटुंबातील सदस्यांवर खोटे आरोप करत आहे. त्यामुळं मी तिच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.” असं राज कुंद्रा या मुलाखतीत म्हणाला. त्याच्या या आरोपांवर कवितानं अद्याप कुठलही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
  Published by:Mandar Gurav
  First published: