• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • कोर्टात जाताना राज कुंद्राने का जोडले हात? 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल

कोर्टात जाताना राज कुंद्राने का जोडले हात? 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल

शुक्रवारी राज कुंद्राला भायखळा जेलमधून (Byculla jail) मुंबई कोर्टात (Mumbai court) हजर करण्यात आलं. त्यावेळी त्याचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

 • Share this:
  मुंबई 23 जुलै : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्रा (Raj Kundra) हा पोलिसांच्या ताब्यात आहे. अश्लिल चित्रफीती (Pornography) प्रकणात त्याची चौकशी सुरू आहे. तर रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. काही अभिनेत्रींनी त्याच्या विरोधात जवाबही नोंदवला आहे. 19 तारखेला त्याला अटक झाल्यानंतर 23 तारखेपर्यत कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र आता त्याची कोठडी 27 जुलै पर्यत वाढवण्यात आली आहे. शुक्रवारी राज कुंद्राला भायखळा जेलमधून (Byculla jail) मुंबई कोर्टात (Mumbai court) हजर करण्यात आलं. त्यावेळी त्याचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. पोलिसांच्या गरांड्यात असलेला राज कोर्टातून बाहेर पडल्यानंतर गाडीत बसतो. मात्र ज्यावेळी त्याला अटक करण्यात आली तेव्हा आणि आता राजच्या देहबोलीत फारच फरक जाणवत होता.

  राज कुंद्रासोबत क्राईम ब्रँचची टीम पोहोचली शिल्पाच्या घरी; समोरा-समोर होऊ शकते चौकशी

  गाडीत बसल्यानंतर राजने गाडीच्या बाहेर असलेल्या पत्रकारांना चक्क हात जोडल्याचं पाहायला मिळालं. त्याचा हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. दरम्यान अटक झाल्यानंतर राज पोलिसांना सरळ सरळ उत्तरं देत नसल्याचंही समोर आलं होतं. तर आता त्याची कोठडी आणखी वाढवण्यात आली आहे.
  राजसह आणखी 11 जणांना या प्रकरणात अटक झाला आहे. अनेकंची चौकशी देखील सुरू आहे. तर राज हाच या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार असल्याचं क्राइम ब्रँच पोलिसांच्या तापासावरून लक्षात येत आहे. काही सबळ पुरावेही त्यांच्या हाती लागले आहेत. राज कुंद्रावर आईपीसी (IPC) सेक्शन 420 (फसवणूक), 34, 292 आणि 293 याशिवाय आईटी अॅक्ट  संबंधित कलम आणि इनडीसेंट रिप्रेजेंटेशन ऑफ वुमन (प्रोहिबिशन) अॅक्ट अन्वये गुन्हे नोंदण्यात आले आहेत. क्राइम ब्रँचने वियान या राजच्या ऑफिसवर धाड टाकली असता काही व्हिडीओ त्यांच्या हाती लागले आहेत. तर काही डेटा हा पोलिस पोहोचण्यापूर्वीच डिलीट केला गेला होता. असंही वृत्त समोर आलं होतं.
  Published by:News Digital
  First published: