मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Raj Kundra Case : त्या Video मध्ये 2 ते 3 मिनिटांची Nudity; क्राइम ब्रान्चच्या चौकशीनंतर तनवीरची कबुली

Raj Kundra Case : त्या Video मध्ये 2 ते 3 मिनिटांची Nudity; क्राइम ब्रान्चच्या चौकशीनंतर तनवीरची कबुली

राज कुंद्रा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. 27 जुलै पर्यंत त्याची कोठडी वाढवण्यात आली आहे.

राज कुंद्रा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. 27 जुलै पर्यंत त्याची कोठडी वाढवण्यात आली आहे.

राज कुंद्रा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. 27 जुलै पर्यंत त्याची कोठडी वाढवण्यात आली आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 25 जुलै :  राज कुंद्रा प्रकरणात सध्या क्राइम ब्रान्चकडून त्याच्या कंपनीशी संबंधित सर्वांची कसून चौकशी केली जात आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्राच्या (Raj Kundra) अटकेनंतर अभिनेत्रीचीही कसून चौकशी करण्यात आली. राज सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. 27 जुलै पर्यंत त्याची कोठडी वाढवण्यात आली आहे.

दरम्यान आज त्याच्या कंपनीच्या प्लॅटफॉर्मसाठी व्हिडीओंची निर्मिती करून देणारा तनवीर हाशमी याची चौकशी करण्यात आली. त्याने चौकशीनंतर माध्यमांशीही संवाद साधला. यावेळी तो म्हणाला की, मी राज कुंद्रा यांना कधी भेटलो नाही, मात्र त्यांच्या कंपनीसाठी काम करीत होता. 20 ते 25 मिनिटांच्या व्हिडीओमध्ये 2 ते 4 मिनिटांची Nudity असल्याचं त्यानं मान्य केलं आहे. यापूर्वीही त्याची चौकशी करण्यात आली होती. आताही त्याची क्राइम ब्रान्चकडून चौकशी करण्यात आली. मी काही चुकीचं केलं नाही, म्हणून मला जामीन मिळाल्याचं त्याने सांगितलं.

हे ही वाचा-तिला बाहेर काढावचं लागेल' त्या अभिनेत्रीच्या अटकेनंतर हडबडली होती राजची टीम

काय आहे शिल्पा शेट्टीचं म्हणणं..

शिल्पाने तिच्या स्टेटमेंटमध्ये पुढे म्हटलं आहे की, पॉर्न चित्रपटांसंबधी तिला कोणतीही माहिती नाही. तिने दावा केला की, तिचा पती राज कुंद्रा निर्दोष आहे. तिने म्हटलं की, “दुसरे आरोपी पॉर्न बनवत असतील, लंडनमध्ये असणारे राजचे नातेवाईक जे अँपमध्ये व्हिडीओ अपलोड करायचे. त्यात त्यांचा हात असू शकतो. राज अँपसाठी व्हिडीओ बनवायचा.”

दरम्यान शुक्रवारी शिल्पाची कसून चौकशी झाली त्यात तिला अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न विचारण्यात आले होते,

* तुला हॉटशॉट विषयी माहीती आहे का व ते कोण चालवतं?

* हॉटशॉटच्या व्हिडीओ कंटेटविषयी तुम्हाला माहिती आहे का?

* तुम्ही कधी हॉटशॉटच्या कामात मदत केली आहे का?

* कधी प्रदीप बक्शी ( राज कुंद्राचा मेहुणा) सोबत राज कुंद्राने हॉटशॉट बद्दल चर्चा केली होती?

* तुम्ही २०२० मध्ये वियान कंपनीतून बाहेर का पडलात, जेव्हा की तुमचे मोठे शेअर्स होते?

* तुम्हाला वियान आणि कॅमरिनमधील पैशांचा व्यवहार माहीत आहे?

* अश्लिल चित्रफिती लंडनला पाठवणे आणि अपलोड करण्यासाठी अनेकदा वियानच्या ऑफिसचा उपयोग झाला हे तुम्हाला माहीत आहे का?

* तुम्हाला राज कुंद्राच्या सगळ्या व्यवसायांची माहिती आहे?

असे प्रश्न शिल्पाला विचारण्यात आले होते.

First published:

Tags: Porn video, Raj kundra, Shilpa shetty