• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ॲडल्ट व्हिडिओजसाठी रोज बनायचा नवा Whatsapp Group; अटकेपूर्वी राजच्या ऑफिसमधून डिलीट झाला मोठा डेटा

ॲडल्ट व्हिडिओजसाठी रोज बनायचा नवा Whatsapp Group; अटकेपूर्वी राजच्या ऑफिसमधून डिलीट झाला मोठा डेटा

राजच्या अटके पूर्वी वियान या त्याच्या ऑफिस मधून मोठा डेटा डिलीट झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 • Share this:
  मुंबई 23 जुलै: उद्योगपती राज कुंद्राला (Raj Kundra) पोलिसांनी अटक केल्यानंतर हळू हळू अनेक गोष्टी आता बाहेर येत आहेत. दरम्यान हे प्रकरण फेब्रुवारी महिण्यापासून सुरू आहे. पण राजने लाच देऊन स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला होता असही समोर आलं होतं. तर आता आणखी काही धक्कादायक माहिती समोर येत आहे. राज कुंद्राच्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. राज सह अन्य काही लोकांचीही चौकशी सुरू आहे. दरम्यान राजच्या अटके पूर्वी वियान या त्याच्या ऑफिस मधून मोठा डेटा डिलीट झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Raj Kundra arrest updates)

  Raj Kundra arrest Live Updates: राज कुंद्राविरोधात जवाब दिलेल्या अभिनेत्रीला जिवे मारण्याची धमकी; न्युड ऑडिशनचा केला होता आरोप

  राज कुंद्रा चालवत असलेली ॲडल्ट वेबसाईट ‘हॉटशॉट’च्या (Hotshot) कंटेंट साठी रोज नवा व्हॉट्सॲप ग्रुप बनवला जायचा असाही खळबळजनक खुलासा या प्रकरणात समोर आला आहे. त्यामुळे सायबर क्राईम ब्रांच (Crime branch) कडून वाचण्यासाठी सगळी तयारी करण्यात येत होती हे ही आता समोर येत आहे. दरम्यान अशाच काही ग्रुप्स ची माहिती न्यूज 18 च्या हाती लागली आहे. ज्यादिवशी शुट केलं जायचं त्यादिवशी नवा ग्रुप बनवला जाई व आर्टिस्ट न्यूड असं नाव दिलं जाई. फेब्रुवारी महिन्यात हे प्रकरण समोर आलं होतं. तेव्हा गहना वशिष्ठ समवेत काहींना अटक करण्यात आली होती.

  मेहुणी शमिता शेट्टीसोबतही राज कुंद्रा करणार होता चित्रपट; अभिनेत्रीने केला खळबळजनक दावा

  याशिवाय पोलिस कधीही आपल्या पर्यंत पोहोचू शकतात याची भनक देखील राज कुंद्रा ला होती. त्यामुळे पोलिसांनी ऑफिसवर धाड टाकण्याआधीच जवळपास 2TB डेटा हा डिलीट करण्यात आला होता. क्राइम ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार अद्याप पोलिसांनी 100 हून अधिक अश्लील चित्रफीती त्यांनी हस्तगत केल्या आहेत. पुढील तपास सुरू असून राज कुंद्राची पोलीस कोठडी आता 29 जुलै पर्यंत वाढविण्यात आली आहे.
  Published by:News Digital
  First published: