राज्य शासनाच्या राज कपूर आणि चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कारांची घोषणा

राज्य शासनाच्या राज कपूर आणि चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कारांची घोषणा

चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते श्री विक्रम गोखले यांना आणि व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते अरुण नलावडे यांना घोषित करण्यात आला आहे.

  • Share this:

 १९ एप्रिल :  राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री  सायरा बानो यांना घोषित केलाय, तर  राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेते जॅकी श्रॉफ यांना देण्यात येणार आहे.  तसंच चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते श्री विक्रम गोखले यांना आणि  व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते अरुण नलावडे यांना  घोषित करण्यात आला आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री विनोद तावडे यांनी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवरर्षी देण्यात येणाऱ्या  या पुरस्काराची घोषणा केली.

मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरता ज्यांनी दीर्घकाळ आपलं आयुष्य घालवलंय, तसंच चित्रपट सृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा ज्येष्ठ व्यक्तींना या पुरस्कारांनी गौरवलं जातं.  जीवनगौरव पुरस्काराचं स्वरूप ५ लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह तर विशेष योगदान पुरस्काराचं स्वरूप ३ लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं आहे.

 

First published: April 19, 2017, 4:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading