जयंती विशेष : दिग्दर्शकाची एक थप्पड आणि बदललं राज कपूर यांचं आयुष्य!

जयंती विशेष : दिग्दर्शकाची एक थप्पड आणि बदललं राज कपूर यांचं आयुष्य!

वडील पृथ्वीराज कपूर यांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनया क्षेत्रात आलेल्या राज कपूर यांनी हिंदी सिनेसृष्टीत एक नवा अध्याय लिहिला.

  • Share this:

मुंबई, 14 डिसेंबर : बॉलिवूडचे शोमॅन राज कपूर यांची आज जयंती. राज कपूर यांचा जन्म 14 डिसेंबर 1924 ला पेशावरमध्ये झाला होता. भारत-पाकिस्तान फाळणीच्यावेळी त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर भारतात आले. त्यांनी नाटकांची विशेष आवड होती. त्यांनी अभिनय क्षेत्रात चांगलं यश संपादन केलं. तर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत अभिनया क्षेत्रात आलेला त्यांचा मुलगा राज कपूर यांनी हिंदी सिनेसृष्टीत एक नवा अध्याय लिहिला. मात्र त्यांच्या करिअरच्या सुरुवातीबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. राज कपूर यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊयात राज कपूर अभिनेता कसे झाले...

राज कपूर आणि दिग्दर्शक केदार शर्मा यांच्यात एक अतूट नातं होतं. राज कपूर त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात असिस्टंट म्हणून केदार शर्मांसोबत काम करत असत. एकदा क्लॅप देताना चूक झाल्यानं केदार यांनी सर्वांसमोर राज कपूर यांच्या कानशीलात लगावली. त्यावेळी राज यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही मात्र त्यांचे डोळे पाहिल्यावर केदार शर्मांना आपण केलेल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याचा पुढचा सिनेमा ‘नीलकमल’साठी राज यांना नायकाच्या भूमिकेसाठी कास्ट केलं.

TANHAJI चित्रपटातील एका दृश्यावर आक्षेप, प्रदर्शनाआधी वंशजांना दाखवा अशी मागणी

राज कपूर आणि केदार शर्मा यांचे संबंध खूपच घनिष्ट होते. महाराष्ट्र सरकारनं केदार शर्मा यीं राज कपूर अवॉर्डनं सन्मानित करण्याची घोषणा केली होती. ज्या दिवशी या अवॉर्डनं सन्मिनित केलं जाणार होतं त्याच्या एक दिवस अगोदरच केदार शर्मा यांचं निधन झालं. तर त्यांच्या जवळपास 10 वर्ष आधी राज कपूर यांचं निधन झालं होतं.

मौसमी चॅटर्जींची मुलगी पायलचं 45 व्या वर्षी निधन; 2 वर्षांपासून पायल कोमात होती.

केदार शर्मा कदाचित एकटेच किंवा मोजक्याच दिग्दर्शकांपैकी एक होते ज्यांनी त्यांच्याच सिनेमाचा रिमेक तयार केला. 1941 मध्ये मेहताब स्टारर चित्रलेखा सिनेमा त्यांनी पहिल्यांदा तयार केला होता. मात्र त्यावेळी त्यांना तो तितकासा आवडला नव्हता. त्यामुळे त्यांनी 1964 मध्ये मीना कुमारी, प्रदीप कुमार आणि अशोक कुमार यांना घेऊन पुन्हा एकदा ‘चित्रलेखा’ बनवला.

केदार शर्मा यांचा हॉलिवूड प्रवास खूपच रोमांचक राहिला. त्यांचं आत्मचरित्र 'द वन अँड लोनली केदार शर्मा'मध्ये त्यांनी या प्रवासाचं विस्तारानं वर्णन केलं आहे. त्यावेळी विमान प्रवास खूपच बिकट होता. एका बेंचवर 16 प्रवासी बसत जसं एका विमानात नाही तर जहाजात प्रवास करत आहेत. विमान वारंवार थांबत असे आणि त्यावेळी मुंबईत चांगलं एअर टर्मिनल सुद्धा नव्हतं.

OMG! पाकिस्तानमध्ये वर्षभरात सर्वाधिक सर्च झाली बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री

Published by: Megha Jethe
First published: December 14, 2019, 9:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading