आय.जी.ची मुलगी होती कृष्णा, एसपीच्या बंगल्यात राज कपूरसह घेतले सात फेरे

राज आणि कृष्णा कपूर यांनी त्यांच्या मुलीचं नाव रीवा शहराशी प्रेरित होऊन रिमा ठेवलं होतं

  • Share this:

फार कमी लोकांना माहित आहे की, १४ डिसेंबर १९२४ मध्ये पेशावर (आत्ताचे पाकिस्तान) मध्ये जन्मलेले बॉलिवूडचे शोमॅन राजकपूर हे मध्यप्रदेशचे जावई आहेत.

राजकपूर यांचे मध्य प्रदेशमधील रीवा जागेशी भावनिक नाते जोडले गेले आहे. राज कपूर यांचा विवाह तत्कालीन रीवाचे आय.जी. करतार नाथ मल्होत्रांची मुलगी कृष्णा मल्होत्रासोबत झाले.

रीवा शहराशी राज कपूर यांचे  नाते वयाच्या २० व्या वर्षीच जोडले गेले. रीवा शहरातील कलाप्रेमींना नाटकाची ओळख व्हावी यासाठी पृथ्वीराज कपूर त्यांची नाटक कंपनी घेऊन रीना शहरात गेले होते. त्यांच्यासोबत तेव्हा राज कपूर आणि शम्मी कपूर होते. शम्मी तेव्हा १५ वर्षांचे होते तर राज कपूर २० वर्षांचे होते.

यानंतर पृथ्वीराज कपूर यांचा रीवा शहरासोबतचा प्रवास अधिक घट्ट झाला. तेव्हा करतार सिंह हे रीवा शहराचे आय.जी होते. पृथ्वीराज त्यांच्याकडे पाहुणे म्हणून गेले होते. ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. करतार आणि पृथ्वीराज यांनी आपल्या मुलांची लग्नही ठरवली. अगदी थोड्याच वेळात करतार सिंह यांची मुलगी कृष्णाशी राज यांचा विवाह झाला.

शोमॅन राजकपूर यांची वरात रीवा शहरात अगदी वाजत गाजत आली. आज जो पोलीस अधीक्षकांचा बंगला आहे, त्याच घरात दोघांचे लग्न झाले. वराती रॉयल मेंशन (स्वागत भवन) मध्ये थांबलेले. अशापद्धतीने रीवा शहराचं नातं बॉलिवूडच्य अशा कुटुंबासोबत जोडलं गेलं, ज्याची प्रत्येक पिढी ही सिनेसृष्टीत राज्य करत आहे.

फार कमी लोकांना माहित आहे की, राज आणि कृष्णा कपूर यांनी त्यांच्या मुलीचं नाव रीवा शहराशी प्रेरित होऊन रिमा ठेवलं होतं. असं म्हटलं जातं की, या शहराची आठवण नेहमीच स्वतः जवळ ठेवण्यासाठी राज आणि कृष्णा यांनी मुलीचं नाव रिमा ठेवलं होतं.

कृष्णा मल्होत्राचे भाऊ प्रेमनाथ आणि राजेंद्रनाथ मल्होत्रा हेदेखील तेव्हाचे प्रसिद्ध कलाकार होते. राज कपूरसह त्यांचे छोटे भाऊ शम्मी कपूर यांचेही आत्मीय संबंध जोडले गेले. शम्मी यांनी स्विमिंग आणि घोडेस्वारी रीवा येथेच शिकली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2018 10:26 AM IST

ताज्या बातम्या