मुंबई, 26 मार्च : बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी अनेक वर्ष चित्रपटसृष्टीत काम केलं पण नंतर चित्रपटसृष्टी सोडून राजकारणाची वाट धरली. त्यापैकीच एक म्हणजे राज बब्बर. राज बब्बर हे चित्रपटसृष्टीतील गाजलेले अभिनेते आहेत, पण काही वर्षांपूर्वी ते राजकरणात देखील सक्रिय झाले. पण अभिनयसृष्टीत देखील ते छोट्या मोठ्या भूमिका करत राहिले. राज बब्बर सध्या त्यांच्या नवीन शो 'हॅप्पी फॅमिली - कंडीशन्स अप्लाय' मुळे चर्चेत आहेत. नुकतेच ते कपिल शर्मा शो मध्ये आले होते तेव्हा त्यांनी बॉलिवूड सोडून राजकारणात गेल्यावर त्यांची काय स्थिती झाली हे सांगितलं आहे.
नुकतंच राज बब्बर यांनी तीन मुलांसोबत विनोदवीर कपिल शर्मा याच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली. राज बब्बर यांच्या मुलाचं नाव प्रतीक बब्बर असून दोन मुलींचं नाव आर्या बब्बर आणि जूही बब्बर आहे. त्यांचा मुलगा प्रतीक देखील चित्रपटसृष्टीतील नावाजलेला आणि सक्रिय अभिनेता आहे. मुलांसोबत कपिलच्या शोमध्ये राज बब्बर यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी त्यांनी आपल्या अभिनयापासून ते राजकारणातील कारकिर्दीपर्यंत अनेक रंजक गोष्टी सांगितल्या.
द कपिल शर्माचा एक प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये होस्ट कपिल शर्मा राज बब्बरला मजेदार प्रश्न विचारताना दिसत आहे. कपिल शर्मा विचारतो, सर, तुमच्यासोबत असे कधी घडले आहे का की निर्मात्याने तुमचे पेमेंट थांबवले आहे, पण तुम्ही राजकारणी झाल्यावर तुमचे पैसे द्यायला पोहोचला आहे? या प्रश्नाला उत्तर देताना राज बब्बर म्हणाले, ‘मी जेव्हा सामाजिक कार्यात सहभाग घेतला, तेव्हा ज्यांनी मला पैसे द्यायला हवे होते, त्यांनी देखील मला पैसे देणं बंद केलं. त्यांना असं वाटलं राज यांना आता पैशांची काय गरज आहे.’ असं राज बब्बर म्हणाले.
View this post on Instagram
राजकारणी व्यक्तींबद्दल राज बब्बर म्हणाले, ‘राजकारणाची प्रतिमा फार वाईट आहे. राजकारणात प्रवेश केला म्हणजे तुमच्याकडे 100-500 कोटी रुपयाची संपत्ती आहे… असा समज होतो. मी राजकरणात गेल्यावर माझी ‘मैं घर का रहा ना घाट का..’ अशी स्थिती झाली. मला इथेही काही पैसे मिळाले नाही आणि राजकरणातही मी काही कमावलं नाही. ' अशा विनोदी अंदाजात राज बब्बर यांनी राजकारणाबद्दल आपली भूमिका मांडली.
राज बब्बर हे काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. राज बब्बर यांनी अनेक सिनेमांमध्ये काम काम केलं. हॅपी फॅमिली - कंडीशन्स अप्लाय या कॉमेडी शोद्वारे त्याने अलीकडेच ओटीटीवर पदार्पण केले आहे. यामध्ये अतुल कुलकर्णी, रत्ना पाठक शाह आणि आयेशा जुल्का हे स्टार्सही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News