"तुझी चड्डी नाय उतरवली तर नावाचा आदित्य नारायण नाही"

विमानतळावर अतिरिक्त सामान बाळगल्यामुळे एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांनी आदित्यकडून 13 हजार रुपये देण्यास सांगितले होते. पण आदित्यने ते देण्यास नकार दिला होता

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 2, 2017 06:44 PM IST

02 आॅक्टोबर : बाॅलिवूडचे लोकप्रिय गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण एका व्हिडिओमुळे अडचणीत सापडलाय. रायपूर विमानतळावर आदित्य नारायण याने एका एअरलाईन्स अधिकाऱ्यासोबत हुज्जत घातली तो एवढ्यावरच थांबला नाही तुझी चड्डी नाही उतरवली तर नावाचा आदित्य नारायण नाही अशी धमकी दिली.

जास्तीचं सामान बाळगल्यामुळे रायपूर विमानतळावरील अधिकाऱ्यांनी आदित्य नारायणला अडवलं होतं. जास्तीचं सामान बाळगल्यामुळे त्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतील अशी मागणी अधिकाऱ्यांनी केली होती. पण आदित्यने अधिकाऱ्यांसोबत वाद घातला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये आदित्य नारायण अधिकाऱ्यांशी वाद घालताना दिसत आहे. "इथं 10 लोक आहे आणि सगळे जण पाहत आहे. आधी तुम्ही मला शिवीगाळ करण्यास सांगितलं त्यानंतरच मी शिवी दिली. तुम्ही मला सांगताय शिवी देण्याचा अधिकार नाही. पण मला जे बोलायचं आहे ते मी बोलणारच असा दम आदित्यने अधिकाऱ्यांना भरला.

आदित्यचा पारा इतका चढला की, तुम्ही मला विमानात प्रवेश करू नाही दिला तर मुंबईला गेल्यावर तुम्हाला पाहून घेऊन, मी कधी ना कधी तरी मुंबईला पोहोचणार आहे. मग बघं, तुझी चड्डी नाय उतरवली ना तर नावाचा आदित्य नारायण नाही अशी धमकीच आदित्यने दिली.

Loading...

विमानतळावर अतिरिक्त सामान बाळगल्यामुळे एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांनी आदित्यकडून 13 हजार रुपये देण्यास सांगितले होते. पण आदित्यने ते देण्यास नकार दिला होता. आदित्यने फक्त 10 हजार रुपये देण्याची तयारी दाखवली होती. त्यापेक्षा जास्त पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला होता.

आदित्यने शिवीगाळ केल्यामुळे एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांनी आदित्यने माफी मागावी अन्यथा प्रवास करू देणार नाही असा पवित्रा घेतला. अखेर आदित्यने आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल माफी मागितली. त्यानंतर आदित्यला प्रवास करता आला. मात्र, विमानतळावर घातलेल्या गोंधळाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2017 06:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...