सई-प्रियाचा पावसातला फिटनेस फंडा!

सई-प्रियाचा पावसातला फिटनेस फंडा!

पावसात मुंबईकर त्रस्त असताना मराठी अभिनेत्रींनी एक वेगळा आदर्श निर्माण केलाय. फिटनेसवरील लक्ष ढळू न देणाऱ्या मराठीतल्या आघाडीच्या अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांनी मुंबईच्या पावसात एक असा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला ज्यामुळे सर्वांचं लक्ष तिथे गेलं.

  • Share this:

मुंबई, १० जुलै : पावसात मुंबईकर त्रस्त असताना मराठी अभिनेत्रींनी एक वेगळा आदर्श निर्माण केलाय.  फिटनेसवरील लक्ष ढळू न देणाऱ्या मराठीतल्या आघाडीच्या अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांनी मुंबईच्या पावसात एक असा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला ज्यामुळे सर्वांचं लक्ष तिथे गेलं.मुसळधार पावसात सुद्धा सकाळी जिमला जाऊन त्यांनी एक छानसा फोटो पोस्ट केला. प्रियानं लिहिलंय, आम्हाला जिमपासून कोणी थांबवू शकत नाही.

प्रिया आणि सईची मैत्री वजनदार या सिनेमापासून दृढ झाली .शैलेश परुळेकर या फिटनेस गुरुंकडे त्या जिमसाठी जातात. पावसात फिटनेसकडे दुर्लक्ष न करणं आणि उत्साहवर्धक राहणं हाच संदेश त्यांनी यानिमित्ताने चाहत्यांना दिलाय.

आपले कलाकार नेहमीच फिटनेस फंडा आजमावत असतात.मग कुठलाही ऋतू असो. आता पावसाळ्यातही त्या जिमला जाणं टाळत नाहीत. म्हणूनच दोघीही एकदम फिट आहेत. इतक्या बिझी शेड्युलमध्येही ते आपला स्टॅमिना शाबूत ठेवतात.

First published: July 10, 2018, 1:13 PM IST

ताज्या बातम्या