मुंबई 20 जुलै: सध्या सोशल मीडियावर एकाच लग्नाची जोरदार चर्चा आहे. ती म्हणजे बिग बॉस (Big boss) फेम अभिनेता आणि प्रसिद्ध गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) यांच्या लग्नाची. गेले अनेक दिवस ही जोडी सोशल मीडियावर हीट ठरत होती. अखेर 16 जुलैला दोघांनी धुमधडाक्यात लग्नगाठ बांधली. त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर साऱ्याचंच लक्ष वेधून घेत आहेत. तर आता लग्नानंतर नव्या सुनेचा गृहप्रवेशही झाला आहे.
राहुल आणि दिशाच्या लग्नाची गेले काही दिवस चर्चा होती. मेहंदी, हळद, लग्न, रिसेप्शन तर त्यानंतर आणखी एक अफ्टर वेडींग पार्टी (after wedding party) असे सगळं साग्रसंगीत कार्यक्रम राहुल- दिशाच्या लग्नाचे पार पडले. तर आता नव्या सुनेच्या गृहप्रवेशाची वेळ आल्याने सासुबाईंनीही अगदी थाटात सुनेचं स्वागत केलं.
'काहीही न करता पैसे कसे कमावतो?' कपिल शर्माचा राज कुंद्रासोबत 'तो' VIDEO होतोय व्हायरल
View this post on Instagram
लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान करत दिशाने गुलाबांच्या पाकळ्यांवरून माप ओलांडत वैद्यंच्या घरी प्रवेश केला. यावेळी राहुलच्या आईने दिशाचं ओवाळून स्वागत केलं. यावेळी घरातील सगळेच सदस्य उपस्थित होते. (Disha Parmar gruhpravesh video)
View this post on Instagram
दरम्यान बिग बॉस नंतर राहुल - दिशा जोडी विशेष हीट ठरली होती. सोशल मीडियावर त्यांचे लाखो चाहतेही आहेत. राहुलने दिशाने बिग बॉसच्या घरात प्रपोझ केलं होतं. तर गेले काही वर्षे ते दोघंही एकमेकांना ओळखत आहेत, तर डेटही करत होते. (Rahul Vaidya - Disha Parmar wedding)
View this post on Instagram
सध्या त्यांची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. त्यांच्या लग्नसमारंभातील अनेक व्हिडीओ व्हायरलं होत आहेत. तर लग्नासाठी एक खास गाणंही (Rahul - Disha Wedding song) त्यांनी तयार केलं आहे. काहीच तासांत राहुलच्या गाण्याला 14 लाखांहून अधिक व्ह्यूजही मिळाले आहेत. याशिवाय दिशाचे लग्नाचे सगळे लुकही व्हायरल होत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Big boss, Entertainment, Marriage, Wedding