मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /राहुल वैद्य गुडघ्याला बाशिंग बांधून तयार पण कपड्यांचा पत्ताच नाही! आठवड्यावर येऊन ठेपलंय लग्न

राहुल वैद्य गुडघ्याला बाशिंग बांधून तयार पण कपड्यांचा पत्ताच नाही! आठवड्यावर येऊन ठेपलंय लग्न

लग्नाला आठवडाच शिल्लक आहे, मात्र राहुल वैद्यची लग्नाची कपडे अद्याप तयार झालेली नाहीत.

लग्नाला आठवडाच शिल्लक आहे, मात्र राहुल वैद्यची लग्नाची कपडे अद्याप तयार झालेली नाहीत.

लग्नाला आठवडाच शिल्लक आहे, मात्र राहुल वैद्यची लग्नाची कपडे अद्याप तयार झालेली नाहीत.

मुंबई 10 जुलै : बिग बॉस फेम अभिनेता आणि प्रसिद्ध गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. नुकतीच त्याने प्रेयसी दिशा परमार (Disha Parmar) सोबत लग्नाची घोषणा केली आहे. येत्या 16 जुलैला दोघेही विवाहबद्ध होणार आहेत. त्यामुळे दोघांच्याही घरी लगीनघाई पाहायला मिळत आहे.

राहुल काही दिवसांपूर्वीच भारतात परतला आहे. खतरों के खिलाडी (Khatron Ke Khiladi 11) या त्याच्या आगामी शो साठी तो केप टाऊन, साऊथ आफ्रिकेत शुट करत होता. पण आता शूटिंग संपल्यानंतर सगळे स्पर्धक भारतात परतले आहेत. त्यामुळे राहुलकडे लग्नाची तयारी करण्यासाठी फारच कमी वेळ आहे.

दैनिक भास्कर ला दिलेल्या मुलाखती त्याने सांगितल की, “जसजसं लग्नं जवळ येत आहे मी नर्व्हस होत आहे. कारण आता लग्नाला काहीच दिवस बाकी आहेत. आणि खूप सारी कामं बाकी आहेत तयारी बाकी आहे. लग्नं म्हटलं की खूप ताम झाम असतो , दुसरं कोरोनाला लक्षात घेऊन सगळं काही करावं लागणार आहे.” पुढे तो म्हणाला की, “विशेष म्हणजे माझे कपडे अद्याप तयार नाहीत.”

राहुल ने पुढे सांगितल की ते दोघेही हिंदू रीती रिवाजा प्रमाणे विवाहबद्ध होणार आहेत.  तसेच वैदिक पद्धतीने फेरे घेणार असून त्यानंतर एक गुरबानी म्हणणार आहेत.

शिल्पा शेट्टीचं सौंदर्य पाहून चाहत्यांच्या कौतुकाचा फुटला बांध; कमेंट्सचा झाला वर्षाव

बिग बॉस नंतर दोघेही फारच प्रकाशझोतात आले होते. राहुलने दिशाला ‘बिग बॉस 14’ (Big Boss 14) च्या घरात प्रपोझ केलं होतं. दरम्यान दोघांची ओळख 2018 साली झाली होती. त्यानंतर ते एकमेकांना डेट करू लागले. सोशल मीडियावर या जोडीची मोठी फॅनफॉलोइंग आहे.

First published:

Tags: Big boss, Entertainment