Video- Rahul Gandhi नी राजीनामा दिल्यानंतर पाहिला आयुष्मान खुरानाचा Article 15 सिनेमा

Video- Rahul Gandhi नी राजीनामा दिल्यानंतर पाहिला आयुष्मान खुरानाचा Article 15 सिनेमा

या व्हिडिओमध्ये सिनेमा पाहताना राहुल त्यांच्या बाजूला बसलेल्या व्यक्तिशी बोलताना दिसत आहेत.

  • Share this:

मुंबई, 04 जुलै- काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी यांनी आयुष्मान खुरानाचा आर्टिकल १५ सिनेमा पाहिला. दिल्लीतील पीव्हीआर ईसीएक्स  सिनेमाज चाणक्य येथे  त्यांनी हा सिनेमा पाहिला. या व्हिडिओमध्ये सिनेमा पाहताना राहुल त्यांच्या बाजूला बसलेल्या व्यक्तिशी बोलताना दिसत आहेत. राहुल गांधी यांनी बुधवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून चार पानी राजीनामा लिहिला. राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये या मागणीवर काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते ठाम होते तर राहुल गांधी राजीनाम्याच्या भूमिकेवर ठाम होते. अखेर राहुल यांनी आपला राजीनामा सादर केला.

या राजीनाम्यात राहुल गांधी यांनी लिहिले की, ‘माझ्यासाठी काँग्रेसची सेवा करणं ही सन्मानाची बाब होती. मी देशवासियांकडून आणि पक्षाकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल अत्यंत आभारी आहे. काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाला मी जबाबदार आहे. त्यामुळेच मी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.काँग्रेस पक्षाचं पुन्हा एकदा संघटन करण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.’

प्रेग्नंट समीरा रेड्डीने नवव्या महिन्यात पाण्यात केलं फोटोशूट

संजय दत्तच्या मुलीच्या बॉयफ्रेंडचं निधन, त्रिशाला दत्तने शेअर केली भावुक पोस्ट

‘मी जर माझ्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्यांना या पराभवासाठी जबाबदार ठरवलं तर ते अन्यायकारक ठरेल. काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची मी नियुक्ती करावी, अशी सूचना माझ्या सहकाऱ्यांनी केली आहे. पण त्या व्यक्तीची निवड मी करणं उचित होणार नाही.पंतप्रधान हे त्यांच्या विजयामागे त्यांच्यावर लागलेले भ्रष्टाचाराचे आरोप दडवू शकत नाहीत. पैसे आणि प्रपोगंडाच्या जोरावर सत्याचा प्रकाश लपवता येत नाही. भारताच्या लोकशाही संस्थांना पुनरुज्जीवन द्यायचं असेल तर भारतीयांना एकत्र यावं लागेल. काँग्रेस पक्षानेही यासाठी स्वत:ला बदलण्याची गरज आहे. मला अनेक भारतीयांनी पाठिंब्याची पत्रं पाठवली त्याबदद्ल सगळ्या भारतीयांचे मी आभार मानतो. मी काँग्रेसचे विचार आणि आदर्शांसाठी लढत राहीन.मी जन्माने काँग्रेसी आहे. काँग्रेस माझ्या रक्तात आहे आणि नेहमीच राहील.’

सनी लिओनीला झाला हा आजार, म्हणून सिनेमाच्या सेटवर नेहमी पोहोचते उशिरा

आयुष्मान खुरानाचा आर्टिकल १५ सिनेमा २८ जून रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमात बदायूं येथील खुनाचे प्रकरण दाखवण्यात आले आहे. याचसोबत सिनेमात समाजात होत असलेल्या भेदभावाबद्दल भाष्य करण्यात आले आहे. सिनेमाने आतापर्यंत ३० कोटींचं कलेक्शन केलं आहे. या सिनेमात आयुष्मान खुराना सोबत ईशा तलवार, एम. नसार, मामोज पाहवा, सयानी गुप्ता, कुमुद मिश्रा आणि मोहम्मद जीशान अयूब यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अनुभव सिन्हा दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती झी स्टुडिओने केली असून येत्या २८ जूनला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे.

SPECIAL REPORT: अभिनेत्री भाग्यश्री दासानीच्या पतीला मुंबई पोलिसांकडून अटक

First published: July 4, 2019, 6:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading