माझ्या वडिलांचं देशासाठीच योगदान न विसरणारं,'सेक्रेड गेम्स' वादावर राहुल गांधींचं टि्वट

माझ्या वडिलांचं देशासाठीच योगदान न विसरणारं,'सेक्रेड गेम्स' वादावर राहुल गांधींचं टि्वट

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नेटफ्लिक्सच्या वेब सीरीज 'सेक्रेड गेम्स' मधील राजीव गांधी यांच्याबद्दल केलेल्या टीकेवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 जुलै : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नेटफ्लिक्सच्या वेब सीरीज 'सेक्रेड गेम्स' मधील राजीव गांधी यांच्याबद्दल केलेल्या टीकेवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. तसंच या सिरीजमध्ये राजीव गांधी यांच्याविरोधात दाखवण्यात आलेल्या सीन याबद्दल आक्षेप घेऊन सेन्सार करण्यासारखं काही ही नाही असंही त्यांनी सांगितलं.

राहुल गांधी यांनी टि्वट करून आपली प्रतिक्रिया दिली. "माझ्या वडील राजीव गांधी देशासाठी जगले आणि देशासाठी त्यांनी प्राणत्यागही केला. कुठल्याही काल्पनिक वेबसीरीजमधील काय पात्र उभारले आहे याचा काहीही फरक पडत नाही" असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.

मॉडेल म्हणाली – तर त्याने मला संपवून टाकले असते

भाजप आणि संघाला वाटतंय की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर नियंत्रण असणे जरूरी आहे पण मला वाटतं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लोकशाहीचा अधिकार आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय.

सेक्रेड गेम्समध्ये गणेश गायतोंडेची भूमिका साकारणाऱ्या नवाझुद्दीन सिद्दिकीने माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि पंतप्रधान झाल्यानंतर बोफोर्स घोटाळा, तिहेरी तलाक प्रकरणाशी निगडीत शाहबानो प्रकरणावर टीका केलीये. तसंच या सिरीजमध्ये आणीबाणीच्या दरम्यान नसबंदीवर भाष्य करण्यात आलंय.

कुणी बिडीमुळे तर कुणी दिवा पडल्यामुळे,शासन दरबारी मृत शेतकऱ्यांची क्रुर थट्टा

वेब सिरीज रिलीज झाल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सिरीज निर्माता आणि नवाझुद्दीन सिद्दीकीच्या विरोधात तक्रार दाखल केलीये. या वेब सिरीजमध्ये सैफ अली खानही भूख्य भूमिकेत आहे. विक्रम चंद्राच्या पुस्तकावर ही वेब सिरीज आधारीत आहे. या सिरीजचा दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने आहे. पहिल्या सिरीजमध्ये आठ भाग रिलीज करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 14, 2018 10:18 PM IST

ताज्या बातम्या