Home /News /entertainment /

Video: नानांनी पुन्हा एकदा जिंकली सर्वसामान्यांची मनं; राहुलला चुलीवरचं जेवण वाढतानाचा व्हिडीओ व्हायरल

Video: नानांनी पुन्हा एकदा जिंकली सर्वसामान्यांची मनं; राहुलला चुलीवरचं जेवण वाढतानाचा व्हिडीओ व्हायरल

नाना पाटेकर (Nana Patekar) त्यांच्या साध्या सरळ अंदाजासाठी ओळखले जातात. पुरुष स्वयंपाक करू शकत नाहीत या मताला छेद देत नाना पाटेकरांनी सगळ्यांच्या जिभेचे चोचले पुरवले आहेत. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओतून नानांचं साधेपण दिसून येतंय

पुढे वाचा ...
  मुंबई 18 मे - अभिनेते नाना पाटेकरांनी (Nana Patekar) त्यांच्या अभिनयामुळे चाहत्यांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. परंतु त्यांची खरी ओळख ही त्यांच्या वागण्याबोलण्यातून प्रत्येकवेळी दिसून येते. सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार असूनही नाना प्रत्येक वयोगटातील चाहत्यांना आवडतात. याच मुख्य कारण म्हणजे नानांचं सर्वसामान्य असणं. आज यशाच्या शिखरावर पोहोचलेले असताना देखील नानांचे पाय जमिनीवर आहेत याचा प्रत्येय त्यांच्या वागण्याबोलण्यातून नेहमी येतो. आज पुन्हा एकदा नानांच्या नम्रपणाचा आणि माणूसकीचा अनुभव पाहायला मिळाला. नानांनी आजवर शेतात जाऊन शेती केलेली आपण पाहिलीय, गावच्या घरात शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसून जेवणं जेवल्याचं पाहिलं आहे.  परंतु यावेळी नाना चुलीवर जेवण बनवताना पाहायला मिळत आहे. नानांच्या चुलीवर जेवण बनवून वाढतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नाना आपल्या लाडक्या मुलाला राहुलला जेवण वाढताना दिसत आहे. राहुला म्हणजेच  गायक आणि आता नव्याने उदयाला येणारा अभिनेता राहुल देशपांडे (Rahul Deshpande) राहुल देशपांडे सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. त्याच्या गाण्याचे, रियाजाचे अपडेट्स तो नेहमीच शेअर करताना दिसतो. त्याची चिमुकली मुलगी रेणुका (Rahul Deshpande daughter) सोबत धमाल रील तर कधी गाण्यांचे सुंदर व्हिडीओसुद्धा राहुल शेअर करताना दिसतो.  आज राहुल नानांसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे.  राहुलने शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये नाना पाटेकर जेवण बनवताना आणि जेवण वाढताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये नानांनी अनेक लोकांसाठी बनवले असून ते त्यांना प्रेमाने जेवण वाढताना दिसत आहेत. हेही वाचा -  नवरा मेहुलसाठी अभिज्ञा भावेची खास पोस्ट, बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत म्हणाली.... राहुलने हा विडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये नानांच्या जेवणाचं कौतुक केलं आहे.  "मला एक दिवस तुमच्यासारखं जगायला आवडेल. नाना तुम्हाला साष्टांग नमस्कार!" एवढंच नाही तर नानांच्या जेवणाला दाद देत, "जेवण अप्रतिम!" झाल्याचं म्हटलं आहे.
  राहुल आणि नाना पाटेकर यांचं नातं कायमच जवळचं राहिलं आहे. नाना राहुलला मुलासारखं मानतात. मागे एका मुलाखतीत त्यांनी राहुल देशपांडेने साकारलेल्या वसंतरावांच्या भूमिकेसाठी त्याला नॅशनल अवॉर्ड मिळेल अश्या शब्दात त्याचं कौतुक केलं होतं. राहुलने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणलं होतं, "नाना जेव्हा मी वसंतराव पाहायला आले तेव्हा त्यांनी मला आणि निपुणला जवळ बसू नकोस असे सांगितलं. कारण ते चित्रपट बघताना नोट्स काढून काय सुधारणा आवश्यक आहे हे सांगणार होते. चित्रपट संपल्यावर आम्ही त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले, "मी काही नोट्स काढल्या नाहीत त्याऐवजी चित्र काढली. चित्रपट खूप अप्रतिम आहे की त्यात सुधारणा सांगण्यासारखं काही नाही."
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Food, Marathi entertainment, Nana patekar

  पुढील बातम्या