• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • दोन गायकांची रंगली जुगलबंदी, प्रेक्षकांना मिळणार म्युझिकल ट्रीट

दोन गायकांची रंगली जुगलबंदी, प्रेक्षकांना मिळणार म्युझिकल ट्रीट

राहुल देशपांडे आणि आनंद शिंदे दोन्ही गायक. पण दोघांच्या गायकीमध्ये खूपच वेगळेपण. अर्थात, प्रत्येकाचे फॅन्सही भरपूर आहेत. आता हेच दोघं जण अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमामध्ये या आठवड्यात येणार आहेत.

 • Share this:
  मुंबई, 26 डिसेंबर : राहुल देशपांडे आणि आनंद शिंदे दोन्ही गायक. पण दोघांच्या गायकीमध्ये खूपच वेगळेपण. अर्थात, प्रत्येकाचे फॅन्सही भरपूर आहेत. आता हेच दोघं जण अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमामध्ये या आठवड्यात येणार आहेत. संगीताचा वारसा लाभलेले दोन लोकप्रिय गायक आदर्श शिंदे आणि राहुल देशपांडे मंचावर आले. मंचावर बऱ्याच गप्पा रंगल्या तसेच गाणी देखील सादर झाली. राहुल देशपांडे यांनी लहानपणीच्या आठवणी आणि पु ल  देशपांडे यांच्या आठवणी देखील सांगितल्या. राहुल देशपांडे म्हणाले, 'आनंद शिंदे यांची बरीच गाणी ऐकली आहेत. गणपतीच्या वेळेला मिरवणुकीला जायचो तेव्हा तिथे यांची गाणी असायची,  तेव्हा ऐकली आहेत. आदर्श शिंदनं बाप्पा मोरया रे, या गाण्याच्या दोन ओळी म्हणून दाखवल्या. राहुलने देखील बगळ्यांची माळ फुले हे गाणं सादर केलं. यानंतर प्रश्न उत्तर यांचा खेळ सुरू झाला. आदर्शला कसला राग येतो हे विचारल्यास तो म्हणाला मला कसलाच राग येत नाही आणि आलाच तर मी तिथून निघून जातो. कोणालाही दुखवायला मला आवडत नाही,  असं तो म्हणाला. चक्रव्यूह राउंडमध्ये आदर्शला सुरेश वाडकर यांच्याविषयी एक आवडती आणि एक खटकणारी गोष्ट विचारली.  तेव्हा तो म्हणाला, 'आवडती गोष्ट म्हणजे "आवाज". जेव्हा मी त्यांच्याकडे जायचो तेव्हा मला नेहेमी वाटायचं असं गाणं मला आयुष्यात कधीच जमणार नाही. गाणं सोडून दिलेलंच बरं. यानंतर आदर्शने सुरेश वाडकर यांचं ए जिंदगी हे गाणं म्हणून दाखवलं. याच राउंड मध्ये राहुलला प्रशांत दामले यांच्याबाबत आवडती आणि एक खटकणारी गोष्ट विचारली.  तेव्हा तो म्हणाला 'आवडती गोष्ट म्हणजे सळसळतं चैतन्य.' राहुल देशपांडे यांनी सांगितलं की, शास्त्रीय संगीतावर घरं चालवणं खूप कठीण आहे.  कारण ते एका विशिष्ट वर्गाकरता आहे. जेव्हा राजाश्रय होता तेव्हा उत्तम होतं. पण आता लोकाश्रयामध्ये तुम्हाला बाकीच्या गोष्टी देखील बरोबरीने कराव्या लागतात. ...आणि संभाजी महाराज रायगडावर पोचले
  First published: