मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /बॉलिवूडचा 70 वर्षीय अभिनेता घेतोय घटस्फोट, पत्नीनं मागितली 10 कोटींची पोटगी

बॉलिवूडचा 70 वर्षीय अभिनेता घेतोय घटस्फोट, पत्नीनं मागितली 10 कोटींची पोटगी

या अभिनेत्याच्या पत्नीनं अभिनेत्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचं आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या पूर्ण न केल्याचा आरोप केला आहे.

या अभिनेत्याच्या पत्नीनं अभिनेत्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचं आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या पूर्ण न केल्याचा आरोप केला आहे.

या अभिनेत्याच्या पत्नीनं अभिनेत्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचं आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या पूर्ण न केल्याचा आरोप केला आहे.

मुंबई, 21 फेब्रुवारी : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता रघुवीर यादव यांचं 32 वर्षांचं लग्न तुटण्याच्या मार्गावर आहे. रघुवीर यांची पत्नी पूर्णिमा खरगा यांनी रघुवीर यांच्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचं आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या पूर्ण न केल्याचा आरोप केला आहे. पूर्णिमा यांनी वांद्रे कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. यात त्यांनी या केसच्या सुनावणीसाठी 1 लाख रुपये आणि पोटगी म्हणून 10 कोटी रुपयांची मागणी केली आहे. या दोघांच्या लग्नाला आता जवळपास 32 वर्ष झाली आहेत. त्यांचा 30 वर्षीय मुलगा सध्या आई पूर्णिमासोबत राहतो.

रघुवीर यादव यांनी 1988 मध्ये पूर्णिमा खरगा यांच्याशी लग्न केलं होतं. त्यावेळी पूर्णिमा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कथ्थक नर्तिका होत्या आणि रघुवीर बॉलिवूडमधील एक स्ट्रगलिंग अभिनेता होते. पूर्णिमांच्या मते, रघुवीर यांना त्यांच्या करिअरकडे लक्ष देता यावं यासाठी पूर्णिमांनी आपलं करिअर सोडलं. हळूहळू रघुवीर सिनसृष्टीत यशस्वी होत गेले. पण त्यासोबतच त्यांना आपल्या पत्नी आणि मुलाचा विसर पडत गेला. 1995 मध्ये रघुवीर आपला मुलगा आणि पत्नी यांना सोडून निघून गेले त्यानंतर त्यांनी पुन्हा कधीच मागे वळून पाहिलं नाही.

सनी लिओनीकडे 74 वर्षीय अभिनेत्यानं मागितला पर्सनल नंबर, आणि...

पूर्णिमा यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलं आहे, 80 च्या दशकात त्या प्रसिद्ध पंडित बिरजू महाराज यांच्याकडे कथ्थकचे धडे घेत होत्या. या सोबतच जगभरात त्यांचे शो होत असत. रघुवीर यांच्याशी तिची ओळख नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये झाली होती. जवळपास 6 महिने एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी 1988 मध्ये त्याच्या जबलपूर या गावी लग्न केलं. हे लग्न अचानक झाल्यानं त्याचं निमंत्रण कोणालाच नव्हतं त्यामुळे त्यांच्या इनव्हिटेशन कार्डचा पुरावा नाही मात्र लग्नाचे काही फोटो त्यांच्याकडे आहेत.

कियारा अडवाणीचं TOPLESS फोटोशूट आहे चोरीचं? वाचा काय आहे नवा वाद

या याचिकेत त्यांनी पुढे म्हटलं, पूर्णिमा यांना विश्वास होता की, रघुवीर नेहमीच त्यांच्यासोबत प्रमाणिक राहतील तसेच सर्व वैवाहिक कर्तव्य पूर्ण करतील पण असं काहीच झालं नाही. 1995 मध्ये पूर्णिमा यांचा रघुवीर यांचे त्यांच्या एका सह अभिनेत्रीशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय आला होता. पण त्यांनी हे लग्न वाचवण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर अक वर्षांनं रघुवीर यांनी स्वतःच घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. जी त्यांनी काही काळानं परत घेतली.

अरे हो हे खरंय! शिल्पा शेट्टी दुसऱ्यांदा झाली आई

First published:
top videos

    Tags: Bollywood