मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

शक्ती मोहन नव्हे तर राघव जुयाल 'या' तरूणीला करतोय डेट? फोटो होतायेत व्हायरल

शक्ती मोहन नव्हे तर राघव जुयाल 'या' तरूणीला करतोय डेट? फोटो होतायेत व्हायरल

 डान्सर, अॅक्टर, डान्सर आणि रिअॅलिटी शो 'डान्स प्लस' (Dance Plus) चा होस्ट राघव जुयाल (Raghav Juyal) अनेकदा शोच्या सेटवर शोच्या जज शक्ती मोहनसोबत फ्लर्ट करताना दिसतो.

डान्सर, अॅक्टर, डान्सर आणि रिअॅलिटी शो 'डान्स प्लस' (Dance Plus) चा होस्ट राघव जुयाल (Raghav Juyal) अनेकदा शोच्या सेटवर शोच्या जज शक्ती मोहनसोबत फ्लर्ट करताना दिसतो.

डान्सर, अॅक्टर, डान्सर आणि रिअॅलिटी शो 'डान्स प्लस' (Dance Plus) चा होस्ट राघव जुयाल (Raghav Juyal) अनेकदा शोच्या सेटवर शोच्या जज शक्ती मोहनसोबत फ्लर्ट करताना दिसतो.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 11 डिसेंबर: डान्सर, अॅक्टर, डान्सर आणि रिअॅलिटी शो 'डान्स प्लस' (Dance Plus) चा होस्ट राघव जुयाल (Raghav Juyal) अनेकदा शोच्या सेटवर शोच्या जज शक्ती मोहनसोबत फ्लर्ट करताना दिसतो. राघव जुयालची शक्ती मोहनसोबतची मस्तीखोर शैली अनेकदा चर्चेत असते. शोचे दर्शक, स्पर्धक आणि इतर जज यांनाही राघव आणि शक्तीची केमिस्ट्री आवडते. पण, खऱ्या आयुष्यात त्यांच्या स्वप्नांची राणी कोण, हे त्यांनी नेहमीच त्याने गुलदस्त्यामध्ये (Raghav Juyal Girlfriend) ठेवलं आहे. राघव जुयालने आतापर्यंन त्याच्या गर्लफ्रेंडबाबत कोणतीच माहिती शेअर केलेली नाही.

पण, त्यानंतरही राघवच्या लव्ह लाईफच्या बाबतीत काही अफवा वेळोवेळी चर्चेत असतात. मात्र, त्यावे या वृत्तांना कधीही दुजोरा दिला नाही आणि कधीच आपले मत ही मांडले नाही. पण, आता त्याचा एक फोटो चर्चेत आला आहे. राघव जुयालच्या आयुष्यात कोणीतरी आहे, ज्याचं त्याच्या हृदयात विशेष स्थान आहे. या फोटोवरून तर असंच काही दिसून येते आहे.

वाचा : PHOTO - लेक अरहानसाठी एकत्र आले मलायका अरोरा-अरबाज खान; पाहताच क्षणी मारली मिठी

राघव जुयाल हा कोणत्या देशी गर्ल प्रमोत नाही तर परदेशी गर्लच्या प्रेमात असल्याची चर्चा आहे. बातमी अशी आहे की, राघव एका स्वीडिश मुलीला डेट करत आहे. या परदेशी तरुणीसोबतचे त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या स्वीडिश तरुणीचे नाव सारा अरहुसियस (Sara Arrhusius) असून ती फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहे. ती इंटीमसीची को-ऑर्डिनेटर आहे.

वाचा : VIDEO : तेजस्विनीच्या करिअरमधला सर्वात बोल्ड टिझर; 'अनुराधा'ची उत्सुकता

साराने नेटफ्लिक्सच्या प्रसिद्ध शो 'यंग रॉयल्स'मध्ये इंटीमसी को-ऑर्डिनेटर म्हणून काम केले आहे. एवढेच नाही तर साराने अनेक स्वीडन शोमध्ये काम केले आहे. राघव 2018 पासून साराला डेट करत असल्याची चर्चा आहे. पण, साराच्या इन्स्टावर नजर टाकली तर दोघे 2017 पासून एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसून येते.

आतापर्यंत सारा आणि राघवने त्यांचे नाते अधिकृत केले नाही. पण, जर तुम्ही साराच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नजर टाकली तर त्या दोघांचे अनेक फोटोज आहेत. राघव आणि साराच्या नात्याबद्दल फक्त त्याच्या जवळच्या मित्रांनाच माहिती आहे. राघव आणि सारा बद्दल सांगितले जात आहे की, ते भारतात ट्रेक दरम्यान भेटले होते. तेव्हापासून दोघेही एकत्र आहेत. सारा अनेकदा राघवला भेटण्यासाठी आणि कामानिमित्त भारतात येत असते.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Tv actor, TV serials