मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ShahRukh Khan : अभिनेता शाहरुख खानला सुप्रीम कोर्टाचा दिलासा; काय आहे नेमकं प्रकरण ?

ShahRukh Khan : अभिनेता शाहरुख खानला सुप्रीम कोर्टाचा दिलासा; काय आहे नेमकं प्रकरण ?

शाहरुख खान

शाहरुख खान

आर्यन खानला दिसाला मिळून काही महिने होत नाही तर शाहरुख खानला एका जुन्या प्रकरणात दिलासा मिळाला आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 26 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान गेल्या काही महिन्यांपासून मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत आला होता. त्यानंतर शाहरुखच्या पठाण सिनेमाची जोरदार चर्चा झाली. दरम्यान आता शाहरुख पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शाहरुखला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. शाहरुख खानचे वकिल रयान करंजवाला यांच्या माहितीनुसार, 2017मध्ये आलेल्या रईस सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान वडोदरा रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीविरोधात फौजदारी खटला दाखल करण्यात आला होता. या चेंगराचेंगरीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. त्यामुळे या प्रकरणी शाहरुख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घ्या.

काँग्रेसचे स्थानीय नेते जितेंद्र सोलंकी यांनी वडोदराच्या एका कोर्टात शाहरुख विरोधात तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण हायकोर्टाने रद्द करण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टात हे प्रकरणा सुरू होतं. सुनावणी दरम्यान हायकोर्टाचा निर्णय योग्य असल्याचं सांगत सुप्रीम कोर्टानं शाहरुखला या प्रकरणी दिलासा दिला आहे.

हेही वाचा - Money Laundering Case: जॅकलिन फर्नाडिसला मोठा दिलासा! 200 करोडच्या मनी लॉड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर

2017मध्ये शाहरुख खान रईस सिनेमाच्या प्रोमोशनसाठी रेल्वेनं मुंबईहून दिल्लीला निघाला होता. रेल्वे रस्त्यात ज्या ज्या ठिकाणी थांबली तिथे उतरून प्रमोशन केलं.  गुजरातच्या वडोदरा रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबली तिथेही शाहरुखनं प्रमोशन केलं. वडोदरा रेल्वे स्थानकात शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली. बघत बघता काही क्षणात रेल्वे स्थानकावरील गर्दी वाढली अक्षरश: चेंगराचेंगरी झाली आणि यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. मृत फरीद हे वडोदरा रेल्वे स्थानकात आपल्या नातेवाईकांना सोडायला आले होते पण चेंगराचेंगरीत त्यांचा मृत्यू झाला.

रईस सिनेमाचं प्रमोशन शाहरुखच्या चांगलंच अंगलट आलं होतं. या प्रकरणी शाहरुख जाहीर माफी देखील मागितली होती. त्यानं म्हटलं होतं, 'फरीदच्या मृत्यूचं मला खुप दु:ख आहे.  वडोदरामध्ये असलेल्या क्रिकेटर इरफान पठाण आणि त्यांचा भाऊ यूसूफ पठाणला मी फरीद खानच्या कुटुंबाची मदत करा असं सांगितलं आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News