पुन्हा लव्ह सीन लीक झाल्यामुळे राधिका आपटे भडकली, म्हणाली....

याआधीही 2015 मध्ये आलेल्या पार्च्ड या सिनेमातील तिचा अभिनेते आदिल हुसेन यांच्यासोबतचा बेडरूम सीन लीक झाला होता.

  • Share this:

राधिका आपटे आणि स्लमडॉग मिलेनिअर अभिनेता देव पटेल यांचा एक इंटिमेट सीन सध्या सोशल मीडियावर लीक झाला आहे. या फोटोंमध्ये दोघं एकमेकांना किस करताना दिसत आहेत. सीन लीक होण्यावर आता राधिकाने आपली प्रतिक्रिया दिली असून तिने याला लोकांची मानसिकता कारणीभूत असल्याचं म्हटलं.

बॉलिवूड लाइफला दिलेल्या मुलाखतीत राधिका म्हणाली की, ‘द वेडिंग गेस्ट सिनेमात अनेक सुंदर सीन आहेत. पण या सगळ्यात लीक झाला तो फक्त सेक्स सीन. या सगळ्याला लोकांची मानसिकताच जबाबदार आहे.’

‘या सीनमध्ये राधिका आपटे आणि देव पटेल हे दोन्ही व्यक्ती आहेत. पण हा सीन फक्त माझ्याच नावावरून व्हायरल होत आहे. देव पटेलच्या नावावरून हा व्हिडिओ व्हायरल का होत नाही,’ असाही प्रश्न राधिकाने यावेळी विचारला. राधिकाच्या सिनेमातील सीन लीक होण्याची ही काही पहिली वेळ नाही.

याआधीही 2015 मध्ये आलेल्या पार्च्ड या सिनेमातील तिचा अभिनेते आदिल हुसेन यांच्यासोबतचा बेडरूम सीन लीक झाला होता. या सिनेमात तिच्यासोबत सयानी गुप्ता, सुरवीन चावला आणि तनिशा चॅटर्जी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

देव पटेल आणि राधिका यांच्या आगामी वेडिंग गेस्ट सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर हा एक ब्रिटीश अमेरिकन सिनेमा आहे. 1 मार्चला हा सिनेमा अमेरिकेत प्रदर्शित झाला होता. अक्शन थ्रिलर असा हा सिनेमा गेल्या वर्षी 8 सप्टेंबरला टोरँटो फिल्म प्रिमिअरमध्ये दाखवण्यात आला होता.

सिनेमाची कथा ही एका ब्रिटीश मुस्लीम व्यक्तिभोवती फिरते. देव पटेलने या सिनेमात त्या ब्रिटीश मुस्लीम व्यक्तिची भूमिका साकारली आहे. सिनेमात देवचं नाव जय असं असतं तर राधिकाने समायरा या मुलीची भूमिका वठवली. राधिकाने या सिनेमातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असलं तरी सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2019 05:46 PM IST

ताज्या बातम्या