मुंबई, 01 जुलै- नेहा धुपियाच्या चॅट शोमध्या राधिका आपटे गेली होती. यावेळी राधिकाला कोणत्या अभिनेत्याने त्याच्या रिलेशनशिपचा मोकळेपणाने स्वीकार करायला हवा असा प्रश्न विचारला. नेहाच्या या प्रश्नाचं उत्तर देताना राधिकाने विकी कौशलचं नाव घेतलं. यापुढे राधिका म्हणाली की, ‘मी एक अशी मुलगी आहे जिला गॉसिप सर्वात शेवटी कळतं. सध्या विकी एका सुंदर मुलीला डेट करत आहे. ती फार चांगली आहे. त्याला समोरून स्वतःच्या नात्याचा स्वीकार केला पाहिजे.’
टीम इंडियाच्या भगव्या जर्सीवर कमेंट करणं पडलं महाग, ट्रोल झाली अभिनेत्री
एका एण्टरटेनमेन्ट वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ‘विकी कौशल त्याचा भाऊ सनी कौशल तसेच मालविका मोहनन आणि तिचा भाऊ एकमेकांना लहानपणापासून ओळखत आहेत. चौघांमध्ये चांगली मैत्री आहे. गेल्या काही दिवसांपासून विकी आणि मालविकामध्ये चांगलं नातं तयार झालं आहे. तर सनी आणि मालविकामध्येही चांगली मैत्री आहे. विकी आणि मालविका आपल्या कामात कितीही व्यग्र असले तरी अनेकदा लंच किंवा डिनरला एकत्र जातात.’
वेबसाइटच्या मते, विकी आणि मालविका दोघंही सिंगल आहेत. अशात दोघं एकमेकांना डेट करायला तयार असल्याचं म्हटलं जात आहे. मालविका मोहनन हे मल्याळम आणि कन्नड सिनेमांमधलं प्रसिद्ध नाव आहे. रजनीकांत स्टारर पेट्टा सिनेमात तिची महत्त्वपूर्ण भूमिका होती. यावर्षी जानेवारी महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.
रिंकूचे हे फोटो होतायेत व्हायरल, दिसते बोल्ड अँड ब्युटिफुल
विकीच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर नुकताच त्याचा आगामी सिनेमातील फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांचा लुक शेअर करण्यात आला. या सिनेमाची कथा १९७१ मध्ये झालेल्या भारत- पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. या सिनेमातून फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविधं पैलू दाखवण्यात येणार आहेत. मेघना गुलझार या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.
जेजुरीत माऊलींच्या पालखीचा मुक्काम, पाहा गडाचा अवर्णनीय Exclusive VIDEO