अनेक घरांमध्ये लैंगिक शोषण होतं - राधिका आपटे

अनेक घरांमध्ये लैंगिक शोषण होतं - राधिका आपटे

'भारतासोबतच संपूर्ण जगात बऱ्याच ठिकाणी घरगुती हिंसाचार, लहान मुलांचे शोषण असे बरेच प्रकार घडतात', असेही ती म्हणाली. पण, कुठेतरी हे सर्व प्रकार थांबवले गेले पाहिजेत असेही तिने स्पष्ट केले.

  • Share this:

20 नोव्हेंबर : लैंगिक शोषणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वात बरीच खळबळ माजली आहे. हॉलिवूड निर्माता हार्वी विनस्टीनवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप बऱ्याच अभिनेत्रींनी लावला आणि या प्रकरणाला वाचा फुटली. बऱ्याच हॉलिवूड अभिनेत्रींसोबतच बॉलिवूड अभिनेत्रींनीसुद्धा त्यानंतर या प्रकरणात उडी घेत याविषयी त्यांची मतं मांडण्यास सुरुवात केली. याविषयीच आता अभिनेत्री राधिका आपटेनेही तिची भूमिका स्पष्ट केली आहे.

राधिका नेहमीच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर तिची ठाम मतं मांडते. यावेळीसुद्धा तिने आपले मत मोठ्या धाडसाने सर्वांसमोर मांडले. 'आजही बऱ्याच घरांमध्ये लैंगिक शोषण होते. त्यामुळे हा प्रकार फक्त सिनेसृष्टीत घडतो असे नाही. भारतासोबतच संपूर्ण जगात बऱ्याच ठिकाणी घरगुती हिंसाचार, लहान मुलांचे शोषण असे बरेच प्रकार घडतात', असेही ती म्हणाली. पण, कुठेतरी हे सर्व प्रकार थांबवले गेले पाहिजेत असेही तिने स्पष्ट केले.

First published: November 20, 2017, 4:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading