मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

 ‘ड्रायव्हरसमोर जायलाही लाज वाटायची’; व्हायरल व्हिडीओ क्लिपवर राधिकानं सांगितला अनुभव

 ‘ड्रायव्हरसमोर जायलाही लाज वाटायची’; व्हायरल व्हिडीओ क्लिपवर राधिकानं सांगितला अनुभव

या सीन्सबद्दल तिला काय वाटतं? किंबहूना असे सीन्स दिल्यावर तिच्या मनात काय विचार येतात? ती कुटुंबीयांचा, समाजातील लोकांचा सामना कसा करते? (Radhika Apte video leak)

या सीन्सबद्दल तिला काय वाटतं? किंबहूना असे सीन्स दिल्यावर तिच्या मनात काय विचार येतात? ती कुटुंबीयांचा, समाजातील लोकांचा सामना कसा करते? (Radhika Apte video leak)

या सीन्सबद्दल तिला काय वाटतं? किंबहूना असे सीन्स दिल्यावर तिच्या मनात काय विचार येतात? ती कुटुंबीयांचा, समाजातील लोकांचा सामना कसा करते? (Radhika Apte video leak)

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 21 मे: राधिका आपटे (Radhika Apte) ही आपल्या बोल्ड आणि बिधास्त व्यक्तिमत्वासाठी प्रसिद्ध आहे. बॉलिवूडच्या इतिहासातील आजवरचे सर्वात चर्चेत राहिलेले टॉपलेस सीन्स तिनं दिले आहेत. राधिका एक उत्तम अभिनेत्री आहे. आजवर तिनं दाक्षिणात्य, हिंदी आणि मराठी या तिन्ही सिनेसृष्टीत अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. अगदी वेब सीरिजमध्ये देखील तिनं आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. (Radhika Apte on nude video leak) तरी देखील राधिका म्हटलं की कायम तिच्या बोल्ड दृश्यांचीच चर्चा केली जाते. मात्र या सीन्सबद्दल तिला काय वाटतं? किंबहूना असे सीन्स दिल्यावर तिच्या मनात काय विचार येतात? ती कुटुंबीयांचा, समाजातील लोकांचा सामना कसा करते? (Radhika Apte video leak)

राधिकानं नुकतीच ग्रेझिया या मॅगझिनला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं चित्रपटांमधील न्यूड दृश्यांबाबत आपला अनुभवही सांगितला. राधिकानं 2015 मध्ये ‘पार्च्ड’ नावाचा एक चित्रपट केला होता. या चित्रपटात तिनं काही न्यूड सीन्स दिले होते. या सीन्सच्या क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. अगदी काही पॉर्न वेबसाईट्सवर देखील या क्लिप्स चर्चेत होत्या. या प्रकरणामुळं राधिकाला जबरदस्त मानसिक धक्का बसला होता.

ती म्हणाली, “पटकथेची गरज म्हणून ती दृश्य करण्यास होकार दिला होता. याचा परिणाम असा होईल अशी अपेक्षा नव्हती. त्या व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मी खूप घाबरले होते. माझा ड्रायव्हर, घरातील मोलकरीण, दुकानात जायला देखील मला भीती वाटत होती. अगदी फोनची रिंग वाजली तरी मी घाबरायचे. कोण काय विचार करेल? कोण माझ्याकडे कुठल्या दृष्टीनं पाहत असेल या विचारामुळं मी जणू नैराश्येत गेले होते. जवळपास एक आठवडा मी स्वत;ला घरात बंद करुन घेतलं होतं. पण अशा परिस्थितीत मला माझ्या कुटुंबीयांनी सावरलं. आईनं मला आत्मविश्वास दिला. मी एक अभिनेत्री आहे. समाजातील व्यक्तिरेखा साकारणं हे माझं काम आहे. हे तिनं मला पटवून दिलं. अन् विशेष म्हणजे स्वत:च्या शरीराबद्दल वाटणारे गैरसमज दूर केले. त्यामुळं मी पुन्हा एकदा पहिल्यासारखं आयुष्य जगू शकले.” यानंतर राधिकानं क्लिन सेव्हन या शॉर्ट फिल्ममध्ये काही न्यूड दृश्य दिली होती. त्यावेळी देखील अशीच चर्चा झाली होती. परंतु राधिकानं मोठ्या आत्मविश्वासानं टीकाकारांच्या टीकेचा सामना केला होता.

First published:

Tags: Bold photoshoot, Bollywood actress, Entertainment