Love Story : कॅलेंडवर चालतं 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीचं आयुष्य, वर्षातून फक्त 12 वेळाच होते पतीची भेट

Love Story : कॅलेंडवर चालतं 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीचं आयुष्य, वर्षातून फक्त 12 वेळाच होते पतीची भेट

या अभिनेत्रीच्या लग्नाला जवळपास 8 वर्षं झाली आहेत पण अजूनही ती स्वतःच्या नवऱ्याला क्वचित भेटते.

  • Share this:

मुंबई, 01 जानेवारी : लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन असतं. लग्नानंतर पती पत्नी एकमेकांसोबत एका घरामध्ये राहतात. पण आजकालच्या धावपळीच्या व्यस्त जीवनामध्ये एकमेकांना भेटणं एकमेकांसोबत वेळ घालवणं फार कमी झालेलं दिसून येत. अशाच एका अभिनेत्री बद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत जी वर्षातून फक्त बारा दिवस आपल्या नवर्‍याला भेटते त्याच्यासोबत वेळ घालवते. चला तर मग पाहूया कोण आहे ही अभिनेत्री ?

ज्या अभिनेत्री बद्दल आपण आता बोलत आहोत या अभिनेत्रीचं नाव आहे राधिका आपटे. राधिका ही बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 2005 मध्ये ‘वाह’ आणि ‘लाईफ हो तो ऐसी’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या राधिका आपटेनं अल्पावधीतच या ठिकाणी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तिला वेब सीरिज क्वीन म्हणूनही ओळखलं जातं.

व्हिडीओ कॉलवर होती दीपिका, को-स्टारनं रणवीर सिंहला केलं KISS

राधिकानं आतापर्यंत फक्त बॉलिवूडच नाही तर तेलुगू, तमिळ, मल्याळम, मराठी आणि बंगाली या भाषांतील सिनेमात काम केले आहे. राधिकाचा जन्म तमिळनाडूमधील वेल्लोरे या गावी झाला. त्यानंतर ती पुणे येथे राहायला आली. तिने नाटकांमध्ये देखील काम केले आहे. 2012 मध्ये राधिका लंडनमधील प्रसिद्ध संगीतकार बेनेडिक्ट टेलर याच्याबरोबर लग्नबंधनात अडकली. आता जवळपास त्यांचा लग्नाला 8 वर्षं झाली आहेत पण अजूनही राधिका स्वतःच्या नवऱ्याला क्वचित भेटते.

दिव्यांकाची ओढणी बिग बींनी पकडली... पाहा VIDEO

 

View this post on Instagram

 

#holiDay #timeoff #goa #sea #sunset #friends @marc_t_richardson #afteraswim

A post shared by Radhika (@radhikaofficial) on

याबाबत बोलताना ती म्हणाली, म्हणाली आम्ही दोघं महिन्यातून एकदाच एकमेकांना भेटतो. यामागील कारण हेच की आम्ही दोघेही आपापल्या कामात फार व्यस्त असतो. प्रेम म्हणजे फक्त एकत्र 24 तास एका घरात राहणं नसतं. त्यापेक्षा तुम्ही एकमेकांना किती समजून घेता हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.

PHOTOS : नेहा-आदित्यची बॅचलर पार्टी, इंडियन आयडलच्या सेटवर लगीनघाई

 

View this post on Instagram

 

such a beautiful day to be out and about. hydrate well, all of you! @smartwaterind #madedifferently

A post shared by Radhika (@radhikaofficial) on

राधिका आपटेचं लग्न किंवा तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तीच लग्न होऊन 8 वर्षे झाली असं म्हटलं तर कोणाला खरं वाटणार ऩाही. कामामध्ये फार व्यस्त असल्याने राधिका व तिचा पती फार क्वचित म्हणजे फक्त महिन्यातून एकदा भेटतात. म्हणजे 365 दिवसांपैकी 12 दिवस ते एकमेकांना भेटतात आणि बाकीचे दिवस एकमेकांच्या आठवणीत जगतात.

पाहा VIDEO : Love Aaj Kal मधील गाण्याची कॉपी उघड? iPhone कनेक्शन आलं समोर

First published: February 1, 2020, 10:54 AM IST

ताज्या बातम्या