मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /चेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका आपटे?

चेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका आपटे?

बेडकाशेजारी बसलेल्या राधिका आपटेच्या (Radhika apte) या फोटोमागे नेमकं दडलंय काय?

बेडकाशेजारी बसलेल्या राधिका आपटेच्या (Radhika apte) या फोटोमागे नेमकं दडलंय काय?

बेडकाशेजारी बसलेल्या राधिका आपटेच्या (Radhika apte) या फोटोमागे नेमकं दडलंय काय?

मुंबई, 26 जुलै : अभिनेत्री राधिका आपटेचा (Radhika apte) हा फोटो पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत झाला असाल. राधिका आपटेने नुकताच आपला हा फोटो (Radhika apte photo) सोशल मीडियावर (Radhika apte Social media) शेअर केला आहे. ज्यात ती चक्क रस्त्यावर हात पसरून दिसते आहे. एका बेडकाच्या (Radhika apte frog) स्टॅच्यूशेजारी ती बसली आहे. तिच्या पायात स्लिपर आहे. रस्त्यावर हात पसरून ती बसलेली असलेली तरी तिच्या अंगावर सेक्सी कपडे आहेत आणि चेहऱ्यावर हास्यही दिसून येत आहे.

राधिका आपटे या फोटोतून नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करते आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल नाही का?. राधिकाने आपला हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत या फोटोमागील कहाणी सांगितली आहे. राधिकाचा हा फोटो म्हणजे ती नेमकी कोणासारखी दिसते हे सांगण्याचा तिचा प्रयत्न.

View this post on Instagram

A post shared by Radhika (@radhikaofficial)

राधिकाने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्रत्येकजण प्राणी आहे. मी बेडकासारखी दिसते, असं ती म्हणाली.

हे वाचा - ऐश-अभिषेक पुन्हा देतायेत Good news? ऐश्वर्याचा नवा फोटो आला समोर

अनेकांना राधिकाचा हा फ्रॉग लूक खूप आवडला आहे. तर काही जणांनी तिला सुंदर आणि सेक्सी बेडूक म्हटलं आहे.  राधिकाने आपण कोणत्या प्राण्यासारखं दिसतो हे सांगितल्यानंतर चाहत्यांनाही तुम्ही कुणासारखे दिसता असा प्रश्न केला आहे. राधिकाच्या या पोस्टवर बऱ्याच कमेंट आल्या आहेत.  तिचा हा लूक पाहून काही जणांनी तर आपण तुझ्यासारखेच बेडूक असल्याचंही म्हटलं.

हे वाचा - मराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती

बहुतेकांना राधिकाचा हा फोटो आवडला आहे. तर काही जणांनी तिच्या बेडूक लूकऐवजी तिच्या चपला आणि कपड्यांवरच चर्चा केली आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress