मराठीतल्या 'या' अभिनेत्रीला हॉलिवूडची ऑफर, पाहा काय म्हणाली

मराठीतल्या 'या' अभिनेत्रीला हॉलिवूडची ऑफर, पाहा काय म्हणाली

वेबसीरिज क्वीन राधिका आपटे लवकरच हॉलिवूड सिनेमात दिसणार आहे.

  • Share this:

मुंबई, 08 नोव्हेंबर : अभिनेत्री राधिका आपटे बॉलिवूडमधील अशी अभिनेत्री आहे जी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. तिनं आपल्या अभिनयाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत बॉलिवूडमध्येही स्थान पक्क केलं आहे. आतापर्यंत असा एकही प्लॅटफॉर्म नाही ज्यात राधिकानं अभिनय केलेला नाही. पण सध्या ती एका वेगळ्याच खुलाशामुळे ती चर्चेत आली आहे. बॉलिवूड नंतर आता राधिका लवकरच हॉलिवूड सिनेमात दिसण्याची शक्यता आहे. तिला एका हॉलिवूड सिनेमासाठी ऑडिशन कॉल आला असून तिनं नुकत्याच एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिनं याचा खुलासा केला आहे.

एका प्रसिद्ध मासिकाला दिलेल्या मुलाखतीत राधिका म्हणाली, मला जेम्स बाँडच्या सिनेमासाठी ऑडिशन कॉल आला होता. मी तो कॉल रेकॉर्ड केला आणि तो काही लोकांना पाठवला. त्यांनी त्यांच्या सिनेमासाठी योग्य अशी अभिनेत्री माझ्यात पाहिली. हिच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या सारख्या अभिनेत्रीसाठी त्यांनी एखादी भूमिका लिहिणं याचं खूप अप्रुप आहे.

मागील वर्षी रिलीज झालेला तिचा अंधाधुन सिनेमा प्रचंड गाजला होता. या सिनेमा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. तसेच तिची मुख्य भूमिका असलेल्या पॅडमॅन सिनेमालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमातील तिच्या भूमिकेचं कौतुकही झालं. याशिवाय लवकरच नवाझुद्दीन सिद्दीकीसोबत तिचा ‘रात अकेली है’ हा सिनेमा सुद्धा रिलीज होणार आहे. राधिकाला वेब सीरिज क्वीन म्हणूनही ओळखलं जातं. तिनं आतापर्यंत 'घुल', 'लस्ट स्टोरीज', 'पाउडर' या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.याशिवाय तिनं करिअरच्या सुरुवातीच्या काळात मराठी सिनेमांमध्येही काम केलं आहे.

===================================================================

VIDEO : कार्तिक एकादशीनिमित्तानं विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 03:16 PM IST

ताज्या बातम्या