S M L

मुंबईत बेस्ट बसमध्ये प्रवास करायची राधिका आपटे

एक काळ असा होता की बाॅलिवूडमध्ये स्वत:ची ओळख बनवायला खूप संघर्ष करावा लागला होता. राधिकाजवळ तर द्यायला घराच्या भाड्याचेही पैसे नसायचे.

Updated On: Sep 7, 2018 03:54 PM IST

मुंबईत बेस्ट बसमध्ये प्रवास करायची राधिका आपटे

शिखा धारिवाल, मुंबई, 7 सप्टेंबर : पुण्यात लहानाची मोठी झालेली राधिका आपटे या वेळी बाॅलिवूडमध्येच नाही, तर वेब सीरिजमध्येही लोकप्रिय झालीय. आज हिंदीतले मोठमोठे निर्माते राधिकाला साईन करायला इच्छुक आहेत. पण एक काळ असा होता की बाॅलिवूडमध्ये स्वत:ची ओळख बनवायला खूप संघर्ष करावा लागला होता. राधिकाजवळ तर द्यायला घराच्या भाड्याचेही पैसे नसायचे.

राधिका आपटे सांगते, 'सुरुवातीला स्वत:ची ओळख करण्यासाठी खूपच त्रास सहन करावा लागला होता. राधिका स्ट्रगलच्या काळात आपल्या वडिलांकडून पैसे घ्यायची नाही. त्यासाठी तिनं नाटकात काम करणं सुरू केलं. त्यावेळी जवळजवळ 8 ते 10 हजार रुपये मिळायचे. राधिका शेअरिंगमध्ये राहायची. तिच्या सोबत एक मुलगी राहत होती. एवढंच नाही, तर राधिका पैसे वाचवण्यासाठी गोरेगाव पूर्वपासून दादरला बेस्टनं जायची.

राधिकासमोर एक मोठी अडचण होती, ती बाॅलिवूडमध्ये कोणाला ओळखत नव्हती. फक्त ओळखायची ती अतुल कुलकर्णीला. त्याचाच नंबर तिच्याकडे होता. राधिका सांगते, कामासाठी कोणाला फोन करायचा हेच तिला कळत नव्हतं. तिला पहिला ब्रेक मिळण्याआधी ती पुण्याला परतली. आता आपण फक्त नाटकातच काम करायचं, अशी खूणगाठ तिनं बांधली होती.

राधिका आपटे जुन्या आठवणीत रमली. ती सांगते, ' मी काही दिवस पुण्यात राहिले. नंतर नृत्य शिकण्यासाठी लंडनला गेले. मी बरंच काही शिकले. माझं आयुष्य बदलून गेलं. लंडनला मला माझे पती भेटले.

सुरुवातीला राधिकाला मुंबई काही आवडली नाही. ती पुण्याहून कामासाठी मुंबईत यायची. मग तिला चांगली कामं मिळायला लागली तेव्हा तिचा बाॅयफ्रेंड बेनेडिक्ट टेलरनंच तिला मुंबईत यायला राजी केलं. 2012मध्ये दोघांनी लग्न केलं.

Loading...
Loading...

राधिका आपटे सांगते, ' तिचा स्ट्रगलचा काळ डिप्रेशनचा होता. मला एक चांगला सिनेमा मिळाला होता. पण मला त्या सिनेमातून काढून टाकलं  कारण माझं वजन 4 किलो वाढलं होतं. मी त्यांना सांगितलंही मी वजन कमी करेन. पण त्यांनी ऐकलं नाही. ही बातमी आली तेव्हा मी बरिस्तामध्ये मित्रमैत्रिणींसोबत होते. केक मागवला होता. पण मी तो केक खाऊच शकले नाही. आता सिनेमा बदललाय. नव्या कलाकारांबरोबर असं कुणी वागत नाही. '

राणादा आणि पाठकबाईंनी केली केरळला मदत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 7, 2018 03:54 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close