न्यूड सीनमुळे चर्चेत राहिली राधिका आपटे, बॉलिवूड करिअरही सापडलं होतं वादात

न्यूड सीनमुळे चर्चेत राहिली राधिका आपटे, बॉलिवूड करिअरही सापडलं होतं वादात

बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री राधिका आपटे आज 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. मात्र तिनं दिलेल्या बोल्ड सीन्समुळे तिचं बॉलिवूड करिअर फारच वादात राहिलं.

  • Share this:

मुंबई, 07 सप्टेंबर : बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री राधिका आपटे आज 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. पुण्यात लहानाची मोठी झालेली राधिका आपटे या वेळी बॉलिवूडमध्येच नाही, तर वेब सीरिजमध्येही लोकप्रिय झालीय. आज हिंदीतले मोठमोठे निर्माते राधिकाला साईन करायला इच्छुक आहेत. पण एक काळ असा होता की बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख बनवायला खूप संघर्ष करावा लागला होता. राधिकाजवळ तर द्यायला घराच्या भाड्याचेही पैसे नसायचे.

राधिका आपटे सांगते, 'सुरुवातीला स्वत:ची ओळख करण्यासाठी खूपच त्रास सहन करावा लागला होता. राधिका स्ट्रगलच्या काळात आपल्या वडिलांकडून पैसे घ्यायची नाही. त्यासाठी तिनं नाटकात काम करणं सुरू केलं. त्यावेळी जवळजवळ 8 ते 10 हजार रुपये मिळायचे. राधिका शेअरिंगमध्ये राहायची. तिच्या सोबत एक मुलगी राहत होती. एवढंच नाही, तर राधिका पैसे वाचवण्यासाठी गोरेगाव पूर्वपासून दादरला बेस्टनं जायची.

TRP मीटर : 'मिसेस मुख्यमंत्री'ची लोकप्रियता कायम, 'ही' मालिका अजूनही नंबर 1

राधिकासमोर एक मोठी अडचण होती, ती बॉलिवूडमध्ये कोणाला ओळखत नव्हती. फक्त ओळखायची ती अतुल कुलकर्णीला. त्याचाच नंबर तिच्याकडे होता. राधिका सांगते, कामासाठी कोणाला फोन करायचा हेच तिला कळत नव्हतं. तिला पहिला ब्रेक मिळण्याआधी ती पुण्याला परतली. आता आपण फक्त नाटकातच काम करायचं, अशी खूणगाठ तिनं बांधली होती.

‘सुहाना ड्रेस ठीक करो’, अंगप्रदर्शन न करण्याचा शाहरुखच्या लेकीला सल्ला

राधिका आपटे जुन्या आठवणीत रमते. ती सांगते, ' मी काही दिवस पुण्यात राहिले. नंतर नृत्य शिकण्यासाठी लंडनला गेले. मी बरंच काही शिकले. माझं आयुष्य बदलून गेलं. लंडनला मला माझे पती भेटले.

सुरुवातीला राधिकाला मुंबई काही आवडली नाही. ती पुण्याहून कामासाठी मुंबईत यायची. मग तिला चांगली कामं मिळायला लागली तेव्हा तिचा बॉयफ्रेंड बेनेडिक्ट टेलरनंच तिला मुंबईत यायला राजी केलं. 2012मध्ये दोघांनी लग्न केलं.

Bigg Boss विनर शिवला वाढदिवसाच्या अगोदरच वीणानं दिलं ‘हे’ खास सरप्राइझ गिफ्ट

राधिका आपटे सांगते, ' तिचा स्ट्रगलचा काळ डिप्रेशनचा होता. मला एक चांगला सिनेमा मिळाला होता. पण मला त्या सिनेमातून काढून टाकलं कारण माझं वजन 4 किलो वाढलं होतं. मी त्यांना सांगितलंही मी वजन कमी करेन. पण त्यांनी ऐकलं नाही. ही बातमी आली तेव्हा मी बरिस्तामध्ये मित्रमैत्रिणींसोबत होते. केक मागवला होता. पण मी तो केक खाऊच शकले नाही. आता सिनेमा बदललाय. नव्या कलाकारांबरोबर असं कुणी वागत नाही. '

राधिकाचं बॉलिवूड करिअर प्रचंड वादात राहीलं. कारण होतं ते तिच्या न्यूड सीनचं. 2015 मध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या एका इंटरनॅशनल सिनेमामध्ये राधिकानं न्यूड सीन दिला होता आणि दुर्दैवानं हा सीन लीक झाला. यामुळे राधिकावर सर्व बाजूंनी टीका झाली. अनुरागनं या बाबत पोलिसांत तक्रार सुद्धा दाखल केली होती. त्यानंतर अनेक सीनेमात राधिकानं बोल्ड सीन दिले आणि ते चर्चेत राहीले. काही दिवसांपूर्वी द वेडिंग गेस्ट या सिनेमातील स्लमडॉग मिलेनिअर अभिनेता देव पटेलसोबतचा एक इंटीमेट सीन लीक झाला होता. हा सीन व्हायरल झाल्यानंतर राधिकानं संताप व्यक्त केला होता. याला लोकांची मानसिकता कारणीभूत असल्याचं तिनं म्हटलं होतं.

===========================================================================

भरलेलं सिलेंडर घेऊन विद्युतचं खतरनाक वर्कआऊट, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2019 09:00 AM IST

ताज्या बातम्या