गुरूसाठी शनाया घेणार 'हा' निर्णय, देणार सगळ्यांना धक्का

गुरूसाठी शनाया घेणार 'हा' निर्णय, देणार सगळ्यांना धक्का

सध्या माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत युद्धाचा प्रसंग आहे. राधिका आणि शनाया आता आमनेसामने येणार. तेही एका टीव्ही शोमध्ये.

  • Share this:

मुंबई, 28 फेब्रुवारी : सध्या माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत युद्धाचा प्रसंग आहे. राधिका आणि शनाया आता आमनेसामने येणार. तेही एका टीव्ही शोमध्ये. राधिकानं हे आव्हान स्वीकारलंय.

शनाया आणि राधिका इरेला पेटल्यात. राधिकाच्या मैत्रिणीचा स्वयंसिद्धा हा शो. या Live शोमध्ये राधिका आणि शनाया समोरासमोर आल्यात. यात राधिका शनायाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारते. तो म्हणजे माझी 300 कोटींची संपत्ती मी तुला देते, तू गुरुनाथला सोड. या प्रश्नाचं उत्तर देताना शनाया कचाट्यात सापडलीय. नाही उत्तर द्यावं तर आईची नाराजी ओढून घ्यावी लागणार. आणि हे म्हटलं तर गुरू हातचा जाणार, शनाया खोटी ठरणार.

शनायापुढे हे महत्त्वाचे प्रश्न पडलेत. आता ती याचं उत्तर नकारात्मक देणार आहे. ती नाही म्हणणार. कारण तिनं  हो म्हटलं तर मालिकाच संपली असती. त्यामुळे शनाया नाहीच म्हणणार आहे. या कार्यक्रमात गुरू आणि शनायाची आईही उपस्थित असते. हा रंजक भाग शनिवारी रंगणार आहे.

शनायाची निर्मिती कशी झाली, याबद्दल लेखक अभिजीत गुरू खूप इंटरेस्टिंग सांगत होता. तो म्हणाला, 'शनायासारख्या मुली बऱ्याचदा काॅर्पोरेटमध्ये दिसतात. त्या खूप बालिश असतात. सेल्फी काढणं, नेलपेंट लावणं यातच रमतात. अशा मुली नेहमीच कुठेतरी बघितल्यासारख्या वाटतात. ' अभिजीतनं शनाया यातूनच तयार केली.

शनायाचा राग येत नाही कधी, यावर अभिजीत म्हणतो, ' ती दुष्ट, कनिंग बनणार नाही, याची आम्ही काळजी घेतलीय. ती मूर्ख आहे, पण दुष्ट नाही.'

शनायाची भूमिका अगोदर रसिका करत होती, आता ईशा करते. हा बदल होताना व्यक्तिरेखेतही काही बदल करावे लागले का? अभिजीत गुरू सांगतो, ' रसिकानं मालिका सोडायचा निर्णय अचानक घेतला. त्यामुळे शनायासाठी अभिनेत्री मिळत नव्हती. पण ईशानं ते चांगलं पेललं. सुरुवातीला ती विचारून करायची.'अभिजीत म्हणतो, व्यक्तिरेखा ही नेहमीच कलाकारांपेक्षा मोठी असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2019 08:54 PM IST

ताज्या बातम्या