मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

60 कोटींचा बंगला, पर्सनल जिम आणि कोट्यवधी किमतीच्या कार्स...बाहुबली Prabhas ची थक्क करणारी संपती!

60 कोटींचा बंगला, पर्सनल जिम आणि कोट्यवधी किमतीच्या कार्स...बाहुबली Prabhas ची थक्क करणारी संपती!

Radheshyam Star Prabhas Property: त्याने हैदराबादमधील उच्चभ्रू ठिकाणी दोन आलिशान घरं खरेदी केली आहेत. प्रभासने हैदराबादमध्ये दोन घरांची खरेदी केली आहे. यातील त्याचा एक आलिशान बंगला जुबली हिल हिल परिसरात आहे

  मुंबई, 12 मार्च: सुपरस्टार प्रभासचा राधेश्याम (Radhe Shyam) हा सिनेमा अलीकडेच प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी जादू करू शकला नसला तरी यामुळे प्रभास मात्र पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रभास त्याचं वैयक्तिक आयुष्य खूपच प्रायव्हेट ठेवत असला तरीही त्याबाबत चर्चा मात्र होतेच. सार्वजनिक ठिकाणी प्रभासचा वावर अगदी साधा असला तरीही त्याला प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायला आवडत आवडतं. अशी माहिती समोर आली आहे की, त्याने हैदराबादमधील उच्चभ्रू ठिकाणी दोन आलिशान घरं खरेदी केली आहेत. मीडिया अहवालानुसार, प्रभासने हैदराबादमध्ये दोन घरांची खरेदी केली आहे. यातील त्याचा एक आलिशान बंगला जुबली हिल हिल परिसरात आहे. सुपरस्टार प्रभास 60 कोटींच्या घरात राहतो आणि त्यांच्या हा बंगला सर्व सुखसोयींनी संपन्न असा लग्झरियस बंगला आहे. बंगल्यामध्येच आहे जिम बाहुबली स्टार प्रभासच्या घराचं आकर्षण म्हणजे त्याने घरामध्येच विशाल जिम बनवली आहे. अलीकडचे त्याचे चित्रपट पाहता तो फिटनेसकडे विशेष लक्ष देत असल्याचे स्पष्ट दिसून येते. सोशल मीडियावर प्रभासच्या बंगल्याच्या परिसरातील अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. त्यानुसार तो बंगल्याच्या परिसरातील गार्डनमध्ये देखील वेळ घालवताना दिसतो. एवढचं नव्हे तर याची देखभाल करतानाही तो अनेकदा दिसतो. हे वाचा-IPL:लखनऊने कॉपी केली TMKOCच्या 'गोकुलधाम प्रीमियम लीग'ची जर्सी? लाँचआधी फोटो लीक रिपोर्ट्सनुसार, प्रभासची संपत्ती जवळपास 250 कोटींच्या घरात आहे. त्याचं कार कलेक्शनही जबदरस्त आहे. प्रभासकडे रेज रोव्हर स्पोर्ट्स, ऑडी A6, बीएमडब्लू 7 सीरिज, रोल्स रॉयस फँटम इ. यासारख्या कोट्यवधीच्या गाड्या देखील आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Prabhas (@actorprabhas)

  त्याचे जवळपास सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू करतात. बाहुबली या सिनेमाने तर संपूर्ण देशात चाहते कमावले. मात्र हल्लीच रीलिज झालेला राधेश्याम आणि त्याआधीचा साहो या चित्रपटांनी हवी तशी कमाई केली नाही. प्रेक्षकांना थिएटरकडे खेचण्यात हे चित्रपट काहीसे अपयशी ठरले आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Prabhas (@actorprabhas)

  राधे श्याम बॉक्स ऑफिस कलेक्शन 'राधे श्याम'च्या पहिल्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सांगायचं झालं तर, पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जवळपास 15 कोटींची कमाई करत जबरदस्त सुरुवात केली आहे. या चित्रपटाने केवळ हिंदी व्हर्जनच्या माध्यमातून 4.50 कोटींचा व्यवसाय केला आहे. परंतु, बॉक्स ऑफिस इंडियाच्या म्हणण्यानुसार, जरी 'राधे श्याम'ने तेलुगूमध्ये उत्तम कमाई केली असली, तरी राज्याबाहेर मात्र तितकीशी तुफान सुरुवात केलेली नाहीय.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Prabhas

  पुढील बातम्या