मुंबई 14 मे: सलमान खानचा बहुप्रतिक्षित राधे (Radhe Your Most Wanted Bhai movie) हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मिश्र प्रतिसाद मिळत आहे. सलमानच्या चाहत्यांनी चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केलाय तर टीकाकार सलमानला ट्रोल करत आहेत. (Salman Khan) दरम्यान प्रसिद्ध समिक्षक आणि अभिनेता कमाल आर. खान यानं देखील सलमानच्या राधेवर प्रतिक्रिया दिली आहे. (Radhe review by KRK) जर तुम्हाला आपला मेंदू सुरक्षित ठेवायचा असेल तर या चित्रपटापासून लांब राहा अन्यथा तुमचं काही खरं नाही असा इशारा त्यानं प्रेक्षकांना दिला आहे.
कमाल खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असतो. बॉलिवूडमधील सेलिब्रिटी ते देशभरात घडणाऱ्या घडामोडी अशा विविध विषयांवर तो रोखठोक प्रतिक्रिया देतो. यावेळी त्याने राधे चित्रपटाच्या निमित्तानं सलमान खानवर निशाणा साधला आहे. तो म्हणाला, “राधेची पटकथा नक्कीच कुठल्या माणसानं लिहिलेली नाही. या लेखकाला नेमकं काय सांगायचं आहे ते कळत नाही. तसंच सलमान आजोबांच्या वयाचा असून नाती एवढ्या वयाच्या दिशासोबत रोमान्स करतोय. चित्रपटात अत्यंत खराब अभिनय आणि अक्शन सीन त्यानं केले आहेत. हा चित्रपट आहे की पब्जी गेम असा प्रश्न पडतो. हा चित्रपट कोरोना सारखाच भयानक आहे. कोरोना तुमच्या फुफ्फुसांवर हल्ला करतो अन् राधे तुमच्या मेंदूवर. त्यामुळं जर तुम्हाला तुमचा मेंदू शाबूत ठेवायचा असेल तर राधेपासून दूर राहा” असा सल्ला त्यानं प्रेक्षकांना दिला आहे.
‘500 लोकांना फोन केले पण कोणीही मदत केली नाही’; टप्पूच्या आईनं व्यक्त केला संताप
This is my full #Radhe Movie Review! The most unwanted Dadu of India! https://t.co/S8TFBRBXrf via @YouTube
— KRK (@kamaalrkhan) May 14, 2021
केआरकेने हा व्हिडीओ युट्यूब आणि ट्विटरवर शेअर केला आहे. सात मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये सलमानवर जोरदार टीका करण्यात आली आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी केआरकेवर टीका केली तर काहींनी आपलं समर्थन दर्शवलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Movie review, Salman khan